आमीर खानच्या दंगल या चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री जायरा वसीन लग्नबंधनात अडकली आहे. तिने सोशल मिडीयाच्या माध्यमातून निकाह चे फोटोस शेअर करत चाहत्यांना गुड न्यूज दिली.
अभिनेत्री जायरा वसीम हिने दंगल चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारली होती. त्यानंतर तिने २०१९ मध्ये चित्रपट सृष्टीला अलविदा म्हंटले. आणि नुकतीच तिच्या निकाहची बातमी समोर आली. या फोटोमध्ये दोघांचेही चेहरे दिसत नसून लग्नाची झलक पाहायला मिळाली. तिने सोशल मिडीयावर दोन फोटो शेअर केले असून पहिल्या फोटोत ती निकाहनाम्यावर सही करताना दिसली. या फोटोमध्ये तिच्या हातावर मेहेंदी लावलेली दिसत आहे. तर दुसऱ्या फोटोत ती आणि तिचा नवरा चंद्र न्याहाळत असताना दिसत आहे. यात त्यांचा दोघांचा चेहरा दिसत आहे.
View this post on Instagram
या चित्रपटातून केले होते पदार्पण
२०१६ मध्ये दंगल हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात आमीर खान सोबत महत्वपूर्ण भूमिका साकारताना जायरा वसीम दिसली होती. तिने वयाच्या १६ व्या वर्षी दंगल चित्रपटातून चित्रपट सृष्टीत पदार्पण केले होते. या चित्रपटात तिने गीता फोगाटची भूमिका साकारली होती. त्यासाठी तिने सर्वोत्कृष्ट सहकलाकार या नामांकनासाठी नॅशनल अवॉर्ड जिंकला होता. तर २०१७मध्ये ती सिक्रेट सुपरस्टार या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसली. परंतु तिने २०१९ मध्ये चित्रपट सृष्टीतून ब्रेक घेतला.