• Home
  • मनोरंजन
  • धुरंधर चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता; बॉर्डर 2 चित्रपटाने प्री तिकीट सेल मध्ये केली कोट्यवधींची कमाई
मनोरंजन

धुरंधर चित्रपटाचा रेकॉर्ड मोडण्याची शक्यता; बॉर्डर 2 चित्रपटाने प्री तिकीट सेल मध्ये केली कोट्यवधींची कमाई

Border 2 Pre Ticket Sales

Border 2 Pre Ticket Sales : येत्या शुक्रवारी सिनेमागृहात बॉर्डर 2 चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी चाहत्यांनी अगोदरच ऍडव्हान्स बुकिंग करून ठेवली आहे. त्यामुळे या चित्रपटाची प्री तिकीट सेल मध्ये कोट्यावधी रुपयांची कमाई झाल्याची माहिती समोर आली आहे.

बॉर्डर 2 चित्रपटाच्या ऍडव्हान्स तिकीट बुकिंगसाठी सोमवारपाऊसन सुरुवात झाली होती. त्यानंतर 48 तासांमध्ये प्री-सेलचा विक्रम कोट्यवधींने रचला गेला. डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेल्या धुरंधर चित्रपटाला देखील बॉर्डर 2 ने प्रदर्शनापूर्वी फक्त आणि फक्त ऍडव्हान्स बुकिंगमध्येच हरवण्याची शक्यता आहे. 1997 मध्ये बॉर्डर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात आला होता. त्यानंतर आता या चित्रपटाच्या सिक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

6.53 कोटी रुपयांची प्री तिकीट कमाई

सॅकनिक यांच्याकडून आलेल्या माहितीनुसार आतापर्यंत 1 लाख 2 हजार 750 तिकिटांची विक्री झाली आहे. तर विदाउट ब्लॉक खुर्च्यांच्या प्री तिकीट सेलमध्ये आतापर्यंत 3.29 कोटी रुपयांची कमाई झाल्याची माहिती मिळाली आहे. एवढेच नाही तर ब्लॉक खुर्च्यांसह ऍडव्हान्स बुकिंगच्या माध्यमातून 6.53 कोटी रुपयांची कमाई चित्रपटाने प्रदर्शित होण्यापूर्वीच केली आहे.

चित्रपटाचे 250 कोटी रुपयांचे बजेट

या चित्रपटाला शनिवार रविवार आणि 26 जानेवारी असा लॉन्ग विकेंड आल्यामुळे फायदा होणार आहे. या विकेंड मध्ये चित्रपटाची कमाई 35 ते 40 कोटी रुपयांपर्यंत होऊ शकते. असा अंदाज ट्रेंड विश्लेषक यांच्याकडून वर्तवण्यात येत आहे. सनी देओल या चित्रपटात मुख्य भूमिकेत असून 250 कोटी रुपयांचे बजेट या चित्रपटाचे आहे.

हे ही वाचा : ओ रोमिओ चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित; व्हॅलेंटाईन दिनाच्या मुहूर्तावर येणार प्रेक्षकांच्या भेटीला

तगडी स्टारकास्ट

बॉर्डर 2 चित्रपटामध्ये तंगडी स्टारकास्ट असणार आहे. हा चित्रपट अनुराग सिंग यांनी दिग्दर्शित केला असून या चित्रपटात सनी देओल फौजीच्या भूमिकेत असणार आहे. त्यांच्यासोबत वरून धवन, दिलजीत दोसां, हा शेट्टी यांच्या महत्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. चित्रपटातसंदेसे आते है…’ या चित्रपटाचे नवीन व्हर्जन रिलीज करण्यात आले आहे. सोशल मीडियावर हे गाणे हिट ठरले असून चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts