Breaking News :
  • Home
  • लाईफस्टाईल
  • आमिर खानला जीवे मारण्याची धमकी? तिसऱ्या लग्नावरून लॉरेन्स बिश्नोई गँग चर्चेत
गुन्हा

आमिर खानला जीवे मारण्याची धमकी? तिसऱ्या लग्नावरून लॉरेन्स बिश्नोई गँग चर्चेत

Aamir Khan

Aamir Khan Death Threat : लॉरेन्स बिश्नोई…पत्ता..तिहार जेल, दिल्ली…कधी राजस्थानचं जेल…तर कधी गुजरातचं साबरमती जेल…बिश्नोईचा जेलचा पत्ता बदलतो, पण दहशत मात्र कायम आहे. कारण बाबा सिद्दीकींना संपवलेली बिश्नोई गँग आता बॉलिवूडच्या मागे हात धुवून लागलीय, कारण आधी त्यांच्या टार्गेटवर सलमान खान आला, त्यानंतर रोहित शेट्टी आला..आणि त्यांच्या टार्गेटवर आमिर खान आलाय. त्याला कारण ठरतंय आमिर खानचं तिसरं लग्न…आता तुम्ही म्हणत असाल आमिरनं तिसलं लग्न केलं, त्यात बेगानी शादीत अब्दुल्ला दिवाना बनून बिश्नोई गँगचं वऱ्हाड काय करतंय? याचंच उत्तर आपण या व्हिडिओत शोधणार आहोत…

[ Aamir Khan ]आमिर खानला धमकी प्रकरण नेमकं काय?

बॉलिवूडचा दिग्गज अभिनेता आमिर खान याला कुख्यात बिश्नोई गँगशी संबंधित असलेल्या समाजकंटकांकडून जीवे मारण्याची गंभीर धमकी मिळालीय. ही धक्कादायक माहिती समोर आल्यानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीत प्रचंड खळबळ उडाली आहे. अभिनेता सलमान खान नंतर आता बिश्नोई गँगच्या हिटलिस्टवर आमिर खान यांचेही नाव आल्याची चर्चा सुरू झाल्यामुळे मुंबईत कमालीचे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ही संपूर्ण घटना सोशल मीडियावरील एका कथित फेसबुक पोस्ट आणि ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून उघडकीस आली, यामध्ये गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टोळीशी [ Lawrence Bishnoi Gang ] संबंधित असलेल्या आरजू बिश्नोई आणि टायसन बिश्नोई नावाच्या व्यक्तींनी आमिर खानला थेट टार्गेट केलंय आहे. या आक्षेपार्ह पोस्टमध्ये आमिर खान याच्या नुकत्याच झालेल्या तिसऱ्या विवाहावर अत्यंत गंभीर आक्षेप घेण्यात आले आहेत. आमिर खान [ Aamir Khan ] यानं पाच जुलै रोजी व्यावसायिक गौरी स्प्रॅट यांच्यासोबत केलेल्या विवाहाचा संदर्भ देत या टोळीने त्यांच्यावर लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आणि सनातन धर्म तसेच भारतीय संस्कृतीच्या विरोधात कृत्य केल्याचा थेट आरोप केला आहे.

हेही वाचा : ‘रामरक्षा म्हणणं त्यांचं काम, पण रक्षा करणं आमचं काम’; नागपुरातून

लॉरेन्स बिश्नोई गँगने काय दावा केला?

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या या धमकीच्या पोस्टमध्ये अत्यंत हिंसक, क्रूर आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर करण्यात आला आहे. धमकी देणाऱ्यांनी उघडपणे म्हटले आहे की, आमिर खान सारखे लोक देशात स्टारडमच्या आडून भारतीय संस्कृतीचा आणि हिंदू धर्माचा अपमान करत आहे आणि अशा गोष्टी आम्ही कोणत्याही परिस्थितीत सहन करणार नाही. या संदेशात पुढे असाही इशारा देण्यात आला आहे की, जे लोक संस्कृतीविरुद्ध वागतात आणि समाज विघातक गोष्टींना खतपाणी घालतात, त्यांच्या श्वास रोखण्याचे काम लॉरेन्स बिश्नोई ग्रुप करेल आणि त्यांना त्यांच्याच भाषेत चोख प्रत्युत्तर दिले जाईल. या ऑडिओ क्लिपमध्ये आमिर खान याच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना देखील अशाच प्रकारे संपवून टाकण्याची धमकी देण्यात आल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बिश्नोई गँगने केवळ आमिर खान याच्या लग्नावरच आक्षेप घेतला नाही, तर या पोस्टच्या दुसऱ्या भागात राजस्थानमधील श्रीगंगानगर येथे एका अल्पवयीन मुलीसोबत झालेल्या अत्याचार प्रकरणाचाही उल्लेख केला आहे. प्रशासनाने त्या प्रकरणात चांगली कामगिरी केली असली तरी काही राजकीय नेते आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जर कोणी कायदा बाजूला ठेवून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला, तर आम्ही त्यांना सोडणार नाही, असाही इशारा या पोस्टमध्ये देण्यात आला आहे.

मुंबई पोलिसांचा तपास कुठपर्यंत?

या सर्व गंभीर प्रकरणाची दखल घेत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने आणि सायबर सेलने अत्यंत वेगाने तपास चक्र फिरवण्यास सुरुवात केली आहे. पोलिसांनी तातडीने या सोशल मीडिया पोस्ट आणि ऑडिओ क्लिपची डिजिटल फॉरेन्सिक तपासणी सुरू केली असून इंटरनेटवर ही पोस्ट नेमकी कुठून आणि कोणत्या आयपी ॲड्रेसवरून अपलोड करण्यात आली, याचा सखोल शोध घेतला जात आहे. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या संपूर्ण प्रकरणाची प्राथमिक पडताळणी अत्यंत बारकाईने केली जात आहे, जेणेकरून ही धमकी खरोखरच बिश्नोई गँगकडून आली आहे की एखाद्या अज्ञात समाजकंटकाने निव्वळ अफवा पसरवण्यासाठी आणि वातावरण खराब करण्यासाठी हे कृत्य केले आहे, याचा छडा लावता येईल. दरम्यानच्या काळात, मुंबई पोलिसांनी कोणतीही जोखीम न पत्करता खबरदारीचा सर्वात मोठा उपाय म्हणून वांद्रे येथील आमिर खान यांच्या निवासस्थानाबाहेर अत्यंत कडक पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे. आमिर खान  यांच्या घराभोवती चोवीस तास कडेकोट पाळत ठेवली जात असून त्यांच्या सुरक्षेत लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे या संपूर्ण प्रकरणावर अद्याप अभिनेता आमिर खान [ Aamir Khan ] किंवा त्याच्या पीआर टीमकडून कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया किंवा जाहीर वक्तव्य समोर आलेले नाही. तसेच, आमिर खान याच्या टीमने किंवा त्यानं स्वतः मुंबई पोलिसांकडे अद्याप कोणतीही अधिकृत एफआयआर दाखल केलेला नाही. आमिर खान यांच्याकडून लेखी तक्रार प्राप्त झाल्यानंतर या प्रकरणात रीतसर गुन्हा दाखल केला जाईल आणि पुढील कठोर कायदेशीर पावले उचलली जातील. मात्र, तक्रार दाखल झालेली नसली तरीही या धमकीचे गांभीर्य ओळखून गुप्तचर यंत्रणा आणि स्थानिक पोलीस यंत्रणा अत्यंत सतर्क मोडवर काम करत आहेत. बॉलिवूडमधील स्टार्सना अशा प्रकारे गँगस्टर्सकडून टार्गेट केले जाण्याची ही पहिलीच वेळ नाही, परंतु आमिर खान याचे नाव यात जोडले गेल्यामुळे हा वाद आता धार्मिक आणि राजकीय वळण घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

आमिर खानच्या लग्नावरून वाद का निर्माण झाला?

Aamir Khan : आमिर खान यांच्या तिसऱ्या विवाहावरून आधीच सोशल मीडियावर एका मोठ्या वादाला तोंड फुटले होते. काही दक्षिणपंथी संघटना आणि नेत्यांनी त्यांच्या या आंतरधर्मीय विवाहावर उघडपणे टीका केली होती, तर दुसरीकडे एका प्रमुख मुस्लिम धर्मगुरुने या विवाहाच्या विरोधात फतवा जारी करत हा विवाह शरिया कायद्यानुसार अमान्य असल्याचे म्हटले होते. या सर्व वादांवर आमिर खान याने पूर्वी स्पष्ट केले होते की, त्यांचे सर्व विवाह हे विशेष विवाह कायद्यांतर्गत म्हणजेच स्पेशल मॅरेज ॲक्टनुसार अत्यंत धर्मनिरपेक्ष पद्धतीने पार पडले असून, यात कोणत्याही प्रकारच्या धार्मिक धर्मांतराला थारा दिलेला नाही. परंतु, या वैयक्तिक वादाचा फायदा उठवून बिश्नोई गँगने यात उडी घेतल्याचे चित्र आता निर्माण झाले आहे. बिश्नोई गँगने [ Lawrence Bishnoi Gang ] यापूर्वी बॉलिवूडचा आघाडीचा अभिनेता सलमान खान याला काळवीट शिकारीच्या प्रकरणावरून अनेकदा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या आहेत आणि त्याच्या घराबाहेर गोळीबारही घडवून आणला आहे. आता सलमान खाननंतर आमिर खान यालाही याच पद्धतीने धमकावले गेल्यामुळे संपूर्ण चित्रपटसृष्टीमध्ये भीतीचे सावट पसरले आहे. मुंबई पोलीस या धमकीच्या मागचे नेमके सूत्रधार कोण आहेत याचा शोध घेण्यासाठी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या तांत्रिक टीमचीही मदत घेत असून, येत्या काही दिवसांत या प्रकरणातील सत्य जनतेसमोर येण्याची शक्यता आहे.

बिश्नोई गँगच्या रडारवर बॉलिवूड का?

Aamir Khan : लॉरेन्स बिश्नोई गँगने बॉलिवूड आणि देशातील मनोरंजन क्षेत्रातील अनेक बड्या सेलिब्रिटींना सातत्याने आपल्या रडारवर ठेवले आहे. या गँगच्या हिटलिस्टवर सर्वात अव्वल नाव अभिनेता सलमान खान याचं आहे. सन १९९८ मधील काळवीट शिकार प्रकरणावरून बिश्नोई समाजाने सलमान खानला शत्रू मानले आहे, कारण बिश्नोई संस्कृतीत या प्राण्याला पवित्र मानले जाते. लॉरेन्स बिश्नोईने अनेकदा न्यायालयाच्या आवारातून आणि तुरुंगातून सलमान खानला जीवे मारण्याची उघड धमकी दिली आहे. केवळ धमक्यांवरच न थांबता, या गँगच्या गुंडांनी मुंबईतील वांद्रे येथील सलमान खानच्या ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ या निवासस्थानाबाहेर प्रत्यक्ष गोळीबारही केला होता. याशिवाय, पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याच्या हत्येची जबाबदारी याच गँगने स्वीकारली होती, ज्यामुळे मनोरंजन विश्वातील बिश्नोई गँगची दहशत वाढलीय.

सलमान खान व्यतिरिक्त बिश्नोई गँगने [ Lawrence Bishnoi Gang ] इतरही अनेक नामवंत कलाकारांना आणि गायकांना आपल्या धमक्या दिल्या आहेत. ज्यात प्रसिद्ध पंजाबी आणि बॉलिवूड गायक मिका सिंग, तसेच यो यो हनी सिंग यानाही या टोळीकडून खंडणीसाठी आणि जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या. या गँगने बॉलिवूडचे सुप्रसिद्ध निर्माते आणि दिग्दर्शक करण जोहर यांनाही ५ कोटी रुपयांच्या खंडणीसाठी धमकावले होते, ज्याची कबुली गँगच्या काही पकडलेल्या गुंडांनी पोलीस चौकशीत दिली होती. इतकेच नव्हे तर, सलमान खानचा जवळचा मित्र असलेला पंजाबी अभिनेता आणि गायक गिप्पी ग्रेवाल याच्या कॅनडातील घराबाहेरही बिश्नोई गँगने गोळीबार घडवून आणला होता. बॉलिवूडपासून ते पंजाबी संगीत विश्वातील बड्या हस्तींना सातत्याने लक्ष्य करून चित्रपटसृष्टीत खंडणीची आणि दहशतीची स्थिती कायम ठेवणे, हाच या बिश्नोई गँगचा मुख्य हेतू राहिला आहे. यात अलिकडेच रोहित शेट्टी बड्या दिग्दर्शकाचं तर कपिल शर्मा या दिग्गज कॉमेडियनचं नावही जोडलं गेलंय, त्यामुळे हे धमकी प्रकरण आता कुठपर्यंत जाणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

img

Harshad Kamble

Website Developer & Technical SEO Specialist

I am Harshad Kamble, a Website Developer, SEO Specialist, and Digital Marketer with expertise in WordPress website development, technical SEO, Google Search Console, Google Analytics.Education : Bachelor Of Commerce And Business Administartion in , Kolhapur.I have 1 year of professional experience as a Digital Marketer and SEO | Website Specialist at Digital Grow Online, Pune, where I worked on website development, on-page SEO, technical SEO, website optimization, and improving search engine visibility. Currently Work in LS Marathi As a Website Developer | SEO Specialist in , Pune.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts