आचार्य चाणक्य यांनी लिहिलेली चाणक्य नीति आपल्याला बऱ्याच गोष्टी शिकवते. या चाणक्य नीती मध्ये चाणक्य म्हणतात संकटाच्या काळात कोणत्याही परिस्थितीमध्ये आपल्या परिवाराची साथ न सोडता धीर धरला पाहिजे. प्रत्येक व्यक्तीला त्याची लाईफ चांगली जगणे आवडत असते. परंतु विधीच्या विधानाला कोण टाळणार? जीवनामध्ये सुख आणि दुःख सुरूच असतात. त्यामुळे दुःखामध्ये असताना देखील त्या परिस्थितीचा सामना करून पुढे चालत रहा.
आचार्य चाणक्य म्हणतात की दुःखाच्या किंवा संकटाच्या वेळेस काय करायला पाहिजे, कशाप्रकारे न घाबरता हसून खेळून खुश राहायला हवं. हे शिकायला हवंसंकटाच्या काळात ज्ञान, अनुभव, शांतता हे सर्व तुमच्या कामात येऊ शकते. आणि या संकटाच्या काळात कधीच या गोष्टी बाजूला करू नका. संकटाच्या काळात आपलं डोकं शांत ठेवूनच काम करावं. या काळात तुम्हाला बरेच लोक वाईट बोलतील, निंदा करतील परंतु याचा परिणाम आपल्या मनावर कधीच होऊ देऊ नका.
आचार्य चाणक्य म्हणतात, कोणतेही संकट आल्यास हिम्मत आणि ध्येय ठेवणे खूप महत्त्वाचे आहे. संकटाच्या वेळी जर तुम्ही अहंकार मनात ठेवला तर तुम्ही नक्की हारू शकतात. जेव्हा परिवार आणि समाजावर प्रश्न निर्माण होतो, तेव्हा एकटा माणूस पूर्णपणे खचतो. त्यावेळी खचून न जाता एकमेकांची आणि परिवाराची बाजू जाणून घेऊन इतरांना सोबत घेण्याची भावना ठेवणे आणि पुढे जात राहणे हे केल्यास यश मिळू शकते. त्याचबरोबर या काळात एकमेकांना दोष देण्यापेक्षा जे झालं ते सोडून पुढे चालत राहणे गरजेचे आहे.
हे हि वाचा : चाणक्य नीति : यश मिळवण्यासाठी एकजुटीने काम करणे गरजेचे, समजून घ्या चाणक्य नीति चे सिद्धांत
आचार्य चाणक्य म्हणतात, कठीण परिस्थितीमध्ये सावधान राहणे अत्यंत गरजेचे आहे. अशा काळात व्यक्तीकडे कमी संधी आणि जास्त आव्हणे असतात. त्यामुळे थोडीशी जरी चूक झाली तर मोठी हानी होऊ शकते. त्यामुळे काळजी घेणे आवश्यक आहे