Festive season special trains India : सणासुदीच्या काळात प्रवाशांची गर्दी आणि तिकिटांची वाढती मागणी लक्षात घेता, रेल्वेनं तब्बल 12,000 गाड्या चालवण्यंचे महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. रेल्वे मंत्रालयानं गुरुवारी जाहीर केलं की देशभरात एकूण 12,075 सण विशेष गाड्या धावत आहेत, ज्यामुळं प्रवाशांना आरामदायी आणि सुरक्षित प्रवास मिळतो. या उपक्रमामुळं सणसुदीच्या काळात लांब पल्ल्याच्या प्रवासाची लक्षणीय सोय झाली आहे.
बिहारनंतर सर्वाधिक गाड्या महाराष्ट्रात :
रेल्वे मंत्रालयानं प्रत्येक राज्यात धावणाऱ्या गाड्यांची संख्या देखील स्पष्ट केली. उदाहरणार्थ, बिहारमध्ये सर्वाधिक 2220 गाड्या धावत आहेत, तर महाराष्ट्रात 2190 गाड्या आहेत. दिल्लीत 1098, उत्तर प्रदेशात 1170 आणि राजस्थानात 961 विशेष गाड्या धावत आहेत. या आकडेवारीवरुन असं दिसून येतं की उत्तर आणि पश्चिम भारतातील सणसुदीच्या काळात प्रवाशांची जास्त मागणी पूर्ण करण्यासाठी रेल्वेनं विशेष व्यवस्था केली आहे.
पूर्व आणि दक्षिण राज्यांसाठी गाड्या :
पूर्व आणि दक्षिण राज्यांबद्दल बोलायचं झालं तर, केरळमध्ये 257, तामिळनाडूमध्ये 281, आंध्र प्रदेशात 382 आणि कर्नाटकात 528 अशा सणांच्या विशेष गाड्या धावत आहेत. गुजरातमध्ये 839, पश्चिम बंगालमध्ये 355, झारखंडमध्ये 244 अशा प्रवाशांना जोडणाऱ्या गाड्या आहेत. रेल्वे मंत्रालयानं प्रवाशांच्या सोयी लक्षात घेऊन ईशान्येकडील राज्यांमध्येही गाड्या चालवल्या आहेत, जसं की आसाममध्ये 80, त्रिपुरामध्ये 90 आणि अरुणाचल प्रदेशमध्ये 16 विशेष गाड्या धावत आहेत.
देश भर में चल रही 12 हजार से अधिक स्पेशल ट्रेनों ने त्योहारों के मौसम में यात्रा को बनाया आसान और आरामदायक।#FestivalSpecialArrangements #YatriSewa pic.twitter.com/RJCmFsINEk
— Ministry of Railways (@RailMinIndia) October 23, 2025
सुरक्षितता आणि सोयीकडे विशेष लक्ष :
रेल्वे मंत्रालयानं असंही सांगितलं की या विशेष गाड्या चालवताना सुरक्षितता आणि सोयीकडे विशेष लक्ष दिलं गेलं आहे. प्रवाशांसाठी अतिरिक्त तिकीट काउंटर, प्रतीक्षालय आणि विस्तृत सुरक्षा व्यवस्था देखील करण्यात आली आहे. या सर्व व्यवस्थांसह, रेल्वे उत्सवाच्या काळात लांब पल्ल्याचा प्रवास करणाऱ्या लोकांना कोणत्याही अडचणी येऊ नयेत याची खात्री करत आहे. यावर्षी, देशभरात 12000 हून अधिक सणांच्या विशेष गाड्या धावत आहेत, ज्यामुळं प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे. प्रवासाची सोय आणि सुरक्षितता लक्षात घेता या सणासुदीच्या काळात हे पाऊल खूप महत्त्वाचं असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे.
हे हि वाचा : दिवाळीनिमित्त मध्य रेल्वेकडून 1702 विशेष गाड्या; कोणत्या मार्गावर धावणार?
कोणत्या राज्यातून किती गाड्या –
बिहार – 2220
केरळ – 257
मध्य प्रदेश – 150
आंध्र प्रदेश – 382
महाराष्ट्र – 2190
अरुणाचल प्रदेश – 16
ओडिशा – 139
आसाम – 80
पंजाब – 59
चंदीगड – 30
राजस्थान – 961
छत्तीसगड – 60
तामिळनाडू – 281
दिल्ली – 1098
तेलंगणा – 307
गोवा – 61
त्रिपुरा – 90
गुजरात – 893
उत्तर प्रदेश – 1170
हरियाणा – 344
उत्तराखंड – 115
जम्मू आणि काश्मीर – 99
झारखंड – 244
पश्चिम बंगाल – 355
कर्नाटक – 528












