Unseasonal rain Maharashtra weather 2025 : शुक्रवारी आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूसह दक्षिण भारतात मुसळधार पाऊस पडू शकतो. हवामान खात्याच्या मते, 24 ऑक्टोबर रोजी आग्नेय आणि लगतच्या पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरावर आणखी एक कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. या प्रभावामुळं केरळ, कर्नाटक, तामिळनाडू, कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसंच या राज्यांच्या काही भागात पूर येण्याची शक्यता आहे.
कमी दाबाचा पट्टा :
पूर्व-मध्य आणि लगतच्या आग्नेय अरबी समुद्रावरील कमी दाबाचा पट्टा गेल्या 3 तासांत 25 किमी प्रतितास वेगानं उत्तर-ईशान्येकडे सरकला. तर 24 ऑक्टोबर 2025 रोजी सकाळी 8.30 वाजता पूर्व-मध्य अरबी समुद्रावर, 14.0° उत्तर अक्षांश आणि 70.6° पूर्व रेखांशाच्या जवळ, पणजी (गोवा) पासून सुमारे 380 किमी पश्चिम-नैऋत्येस, अमिनीदिवी (लक्षद्वीप) पासून 400 किमी वायव्येस आणि मंगलोर (कर्नाटक) पासून 480 किमी पश्चिम-वायव्येस केंद्रस्थानी होता. पुढील 24 तासांत कमी दाबाचा पट्टा पूर्व-मध्य अरबी समुद्रातून जवळजवळ उत्तर-ईशान्येकडे सरकण्याची शक्यता आहे. आग्नेय बंगालच्या उपसागरावरील कमी दाबाचं क्षेत्र गेल्या 3 तासांत हळूहळू पश्चिम-वायव्येकडे सरकलं आहे. तर आज 24 ऑक्टोबर 2025 रोजी भारतीय प्रमाण वेळेनुसार 8.30 वाजता त्याच प्रदेशावर स्थिरावलं आहे.
कमी दाबाच्या क्षेत्राचं चक्रीवादळात रुपांतर :
कमी दाबाचे क्षेत्रपश्चिम-वायव्येकडे सरकण्याची शक्यता आहे. 25 तारखेपर्यंत आग्नेय आणि लगतच्या मध्य बंगाच्या उपसागरावर कमी दाबाचं प्रमाण वाढेल. त्यामुळं 26 तारखेपर्यंत खोल दाबाचं प्रमाण वाढेल, असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर 27 तारखेपर्यंत नैऋत्य आणि लगतच्या पश्चिम-मध्य बंगालच्या उपसागरावर चक्रीवादळाचं रुपांतर होईल, असं हवामान विभागानं म्हटलं आहे.
(A) #Depression over Eastcentral #Arabian Sea:
The Depression over eastcentral and adjoining southeast Arabian Sea moved north-northeastwards with a speed of 25 kmph during past 3 hours and lay centered at 0830 hrs IST of today, the 24th October 2025, overthe eastcentral Arabian… pic.twitter.com/3ILmziNg0f— India Meteorological Department (@Indiametdept) October 24, 2025
अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट :
कोकण आणि मुंबईसह राज्यातील काही भागामध्ये शुक्रवारी, शनिवारी मेघगर्जनेसह हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. यासह रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या ठिकाणीही रविवारपर्यंत हीच स्थिती असणार आहे. सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यांना शुक्रवारी आणि शनिवारी पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर दुसरीककडे जळगाव, धुळे, नंदुरबार नाशिक या जिल्ह्यांनादेखील ‘यलो अलर्ट’ आहे. तर अहिल्यानगर आणि पुणे जिल्ह्यांमध्येसुद्धा पावसाची शक्यता असल्याची माहिती मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं दिली आहे.
हे हि वाचा : ‘अबकी बार मोदी सरकार’ लिहिणाऱ्या पीयूष पांडे यांचं निधन; भारतीय जाहिरात जगतातील जादूगार काळाच्या पडद्याआड
अवकाळी पावसाचं कारण काय? :
अरबी समुद्राच्या अग्नीयेला कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झाल्यामुळं हे क्षेत्र उत्तर आणि ईशान्यच्या दिशेनं सरकत आहे. तसंच दक्षिणेकडील कर्नाटक आणि तामिळनाडकडून कमी दाबाचे क्षेत्र वायव्य आणि पश्चिम दिशेदरम्यान प्रवास करत आहे. याचा सर्वाचा परिणाम म्हणून महाराष्ट्र आणि दक्षिण भागात पावसाची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं मुंबईस कोकणसह राज्यातील काही भागात पुढील तीन दिवस पावसाची शक्यता असल्याचं मुंबई प्रादेशिक हवामान विभागानं म्हटलं आहे. महाराष्ट्रासह भारतातील दक्षिणेतील भागातसुद्धा पावसाची शक्यता आहे. तसेच मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, कर्नाटक, तेलंगणा तसेच ईशान्य भारतातील काही भागातील पावसाची शक्यता असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे.












