यंदा दिवाळीनिमित्त मोठा वीकेंड आल्याने मोठा वीकेंड आल्यामुळे बरेच प्रवासी बाहेर फिरण्यास जाण्याचा प्लान करतात. तसेच महाराष्ट्राची कुलस्वामिनी असलेल्या तुळजाभवानी देवीच्या मंदिरात दिवाळीनिमित्त प्रचंड गर्दी पाहायला मिळाली. ही वाढलेली गर्दी लक्षात घेऊन मंदिर संस्थानाने आता नवीन निर्णय घेतला आहे.
भाविकांच्या सुरक्षितेसाठी आणि सोयीसाठी मंदिर संस्थानांनी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार आज म्हणजेच शनिवारी आणि रविवारी दोन दिवस मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार भाविकांसाठी बंद असणार आहे. तसेच दर्शनासाठी आलेल्या भाविकांना घाटशिळ पार्किंग या पर्यायी मार्गाने मंदिरात प्रवेश मिळणार आहे. जेणेकरून भाविकांचे दर्शन सुरक्षित रित्या होईल आणि गर्दी टाळण्यास मदत होईल.
हे हि वाचा : City name change Maharashtra 2025 : राज्यातील मोठ्या शहराचं बदललं नाव; काय आहे नवीन नाव?
मंदिर प्रशासनाने भाविकांची प्रचंड गर्दी लक्षात घेऊन आणखी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. या संपूर्ण गर्दीचे व्यवस्थापन करण्यासाठी सामान्य आणि रेफरल दर्शन पास देखील बंद ठेवण्यात येणार आहेत. म्हणजे आता भाविकांना एकाच रांगेतून दर्शनासाठी जावे लागेल.
तुळजाभवानी मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मंदिर प्रशासनाला सहकार्य करावे आणि शांतता राखावी असे आवाहन मंदिर संस्थानांनी केले आहे.












