Pune traffic : पुण्यातील वाढती वाहतूक कोंडी (Pune traffic) ही नागरिकांसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. मात्र आता या प्रश्नावर ठोस उपाययोजना (Concrete measures) करण्यासाठी पुणे महानगरपालिकाचे (Pune Municipal Corporation) प्रशासन आणि नवनिर्वाचित महापौर मंजुषा नागपूरे (Mayor Manjusha Nagpure) यांनी पुढाकार घेतला आहे. डिझास्टर मॅनेजमेंट विभागासोबत संयुक्त बैठक (joint meeting)घेऊन शहरातील बॉटलनेक पॉइंट्स आणि अतिक्रमणांवर कारवाईची तयारी सुरू झाली आहे. पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी महापौरांचा किती प्रभावी ठरणार हे येत्या काळात दिसून येईल. का बोलाचाच भात अन् बोलाचीच कडी या उक्ती प्रमाणे होणार ते पाहावे लागणार आहे.
हेही वाचा – शरद पवार खासदार होणार! काँग्रेस आणि ठाकरेंच्या सेनेसोबत बोलणी सुरू, सुप्रिया सुळेंनी फिल्डिंग लावली?
अतिक्रमण यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास
पुण्यातील प्रमुख रस्त्यांवर दररोज निर्माण होणारी वाहतूक कोंडी आता पालिकेच्या अजेंड्यावर अग्रक्रमाने आली आहे. शहरातील विविध चौक, अरुंद रस्ते आणि फूटपाथवरील अतिक्रमण यामुळे नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. याच पार्श्वभूमीवर महापौरांनी डिझास्टर मॅनेजमेंट विभागासोबत बैठक बोलावली असून, शहरातील बॉटलनेक पॉइंट्सचा सखोल अभ्यास केला जाणार आहे. ज्या रस्त्यांवर वारंवार कोंडी होते, त्या ठिकाणी रस्त्यांचे विस्तारीकरण करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
पावसाळा तोंडावर असताना रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत
तसेच लहान आणि अरुंद रस्ते रुंद करण्यासाठी विशेष मोहीम हाती घेतली जाणार आहे. फूटपाथवरील अतिक्रमण हटवण्यासाठी देखील पालिका कारवाई करणार आहे. पावसाळा तोंडावर असताना रस्त्यांची कामे वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी डिझास्टर मॅनेजमेंट विभागाकडून आढावा घेतला जाणार आहे. येणाऱ्या पालिका बजेटमध्ये वाहतूक कोंडी आणि रस्त्यांच्या कामांसाठी विशेष तरतूद करण्याचा विचार सुरू आहे.
कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्धार
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्याचा निर्धार पुणे महानगरपालिका शासन आणि प्रशासनाचा दिसून येत आहे. मात्र, पुणेकरांना दिलासा देणारी ही पावले कितपत प्रभावी ठरतात, हे येत्या काही महिन्यांत स्पष्ट होणार आहे. मात्र वाहतूक कोंडीमुक्त पुण्यासाठी प्रशासनाची ही हालचाल महत्त्वाची मानली जात आहे.












