Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • कुर्बानी वाद पेटला; विरोधानंतर भाजप नगरसेविका प्रीती साटम यांना धमकीचे फोन
Mumbai

कुर्बानी वाद पेटला; विरोधानंतर भाजप नगरसेविका प्रीती साटम यांना धमकीचे फोन

Preeti Satam: मुंबईत बकरी ईडीच्या पार्श्वभूमीवर उघड्यावर कुर्बानी देण्याच्या मुद्द्यावरून वाद अधिकच चिघळला आहे. या प्रकरणात हस्तक्षेप करत विरोध दर्शवणाऱ्या भाजप नगरसेविका प्रीती साटम यांना आता धमकीचे फोन आणि सोशल मीडियावरून इशारे मिळत असल्याची माहिती समोर आली आहे.

बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर उघड्यावर होणाऱ्या कुर्बानीच्या (Kurbani) मुद्द्यावरून निर्माण झालेला वाद आता अधिक तीव्र झाला आहे. गोरेगाव परिसरात उघड्यावर बकरा कुर्बानीला विरोध केल्यानंतर भाजप नेत्या आणि माजी नगरसेविका प्रिती साटम (Preeti Satam) यांना धमक्या मिळाल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी त्यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे.

हेही वाचा: नॉर्मल की पॉवर पेट्रोल? पैसे वाचवण्यासाठी योग्य कोणतं? जाणून घ्या

कुर्बानी देण्यास विरोध

गोरेगाव (पूर्व) परिसरातील (Goregav) एका सोसायटीमध्ये उघड्यावर कुर्बानी देण्यास विरोध करत साटम यांनी प्रशासनाकडे लेखी तक्रार केली होती. त्यानंतर महापालिकेने संबंधित ठिकाणी कुर्बानीची परवानगी रद्द केले. मात्र या निर्णयानंतर काही अज्ञातांकडून त्यांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

प्रिती साटम यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, “स्थानिक नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन आम्ही आवाज उठवला. मात्र त्यानंतर मला ‘या प्रकरणात पडू नका, अन्यथा परिणाम गंभीर होतील’ अशा प्रकारच्या धमक्या मिळत आहेत. संबंधित क्रमांक आणि संदेशांची माहिती पोलिसांना देण्यात आली आहे.”

धमकीचे कॉल्स

या पार्श्वभूमीवर साटम यांनी दिंडोशी पोलीस ठाण्यात धाव घेतली असून, धमकीचे कॉल्स आणि सोशल मीडिया संदेशांचा तपशीर पोलिसांकडून दिला आहे. पोलिसांनी याबाबत तपास सुरू केला असून, दोषींवर कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

दरम्यान, या मुद्द्यावरून मुंबई आणि उपनगरात वातावरण तापले आहे. काही ठिकाणी नागरिकांमध्ये तीव्र वाद झाले असून, काही भागात परिस्थिती तणावपूर्ण बनली होती.

घाटकोपरमधील एका सोसायटीमध्येही कुर्बानीच्या मुद्द्यावरून स्थानिकांचा विरोध वाढला. परिणामी, महापालिकेला परवानगी मागे घ्यावी लागली. नागरिकांनी प्रशासनाकडे पर्यायी जागेची मागणी केली आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts