Normal vs Power Petrol: पेट्रोलच्या वाढत्या किमतींमुळे अनेकजण खर्च वाचवण्याचे मार्ग शोधत आहेत. अशात पेट्रोल पंपावर दिसणारे नॉर्मल आणि पॉवर पेट्रोल हे दोन पर्याय लोकांना संभ्रमात टाकतात. नेमकं कोणतं पेट्रोल जास्त किफायतशीर आहे आणि पैसे वाचवण्यासाठी कोणता पर्याय योग्य ठरेल, हे जाणून घेणं महत्वाचं आहे.
पेट्रोलच्या (Petrol) सतत वाढणाऱ्या किमतींमुळे आज प्रत्येक वाहनधारकाच्या खिशावर ताण पडत आहे. अशा परिस्थितीत गाडी चालवताना खर्च कसा कमी करता येईल. याचा विचार अनेकजण करत असताना. पेट्रोल पंपावर (Petrol Pump) गेल्यावर समोर येणारे दोन पर्याय नॉर्मल पेट्रोल आणि पॉवर पेट्रोल (Normal And Power Petrol) यामुळे अनेकांचा गोंधळ उडतो. काही लोक महाग असलं तरी पॉवर पेट्रोल घेतात, कारण त्यांना वाटतं की त्यामुळे मायलेज वाढेल आणि इंजिन चांगलं राहील. तर काहीजण स्वस्त पर्याय म्हणून नॉर्मल पेट्रोल निवडतात.
हेही वाचा: काँग्रेसला जास्त जागा लढण्याची खुमखुमी आलीय; संजय राऊतांची मित्रपक्षावर जहरी टीका
पण खरोखरच पॉवर पेट्रोल जास्त फायदेशीर असतं का? की आपण फक्त जाहिरातींना बळी पडतो आहोत? नॉर्मल आणि पॉवर पेट्रोलमध्ये नेमका काय फरक आहे आणि पैसे वाचवण्यासाठी कोणता पर्याय योग्य आहे, हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग, सोप्या भाषेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेऊया.
नॉर्मल आणि पॉवर पेट्रोलमध्ये काय फरक?
नॉर्मल पेट्रोल हे रोजच्या वापरासाठी तयार केलेलं साधं इंधन असतं. तर पॉवर पेट्रोलमध्ये जास्त ऑक्टेन लेव्हल असते. इंजिन स्वच्छ ठेवण्यासाठी विशेष अॅडिटिव्ह्स असतात. हे घटक इंजिनची कार्यक्षमता थोडी सुधारू शकतात.
पॉवर पेट्रोल खरंच फायदेशीर आहे का?
पॉवर पेट्रोलचा फायदा प्रामुख्याने खालील गाड्यांमध्ये दिसतो. टर्बो इंजिन असलेल्या कार, महागड्या किंवा हाय परफॉर्मन्स गाड्यामध्ये इंजिन स्मूद चालतं आणि नॉकिंग कमी होतं. मात्र साध्या गाड्यांमध्ये हा फरक फारसा जाणवत नाही.
मायलेजमध्ये फरक पडतो का?
बर्याच लोकांना वाटतं की पॉवर पेट्रोल वापरल्याने मायलेज वाढतं. पण तसं नेहमीच होत नाही.
जर गाडीच्या कंपनीने नॉर्मल पेट्रोल सुचवलं असेल, तर नॉर्मल पेट्रोलच पुरेसं असतं.
पॉवर पेट्रोलमुळे मोठा फरक पडत नाही
पैसे वाचवण्यासाठी कोणतं योग्य?
रोजच्या वापरासाठी नॉर्मल पेट्रोल योग्य आहे. हे स्वस्त असतं आणि सर्वसाधारण गाड्यांसाठी योग्य आहे.











