Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • चक्क पठ्ठ्याने फूड डिलिव्हरी एजंट्सना दिले फ्री पेट्रोल; Video होतोय तुफान व्हायरल
Top News

चक्क पठ्ठ्याने फूड डिलिव्हरी एजंट्सना दिले फ्री पेट्रोल; Video होतोय तुफान व्हायरल

viral video
68

Viral Video Shows Free Petrol For Food Delivery Agents:सोशल मीडियावर सध्या एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे, ज्यात एक व्यक्ती फूड डिलिव्हरी एजंट्स, विशेषतः स्विगी आणि झोमॅटोच्या कर्मचाऱ्यांना फ्री पेट्रोल देताना दिसत आहे.

मिडल ईस्टमधील तणावामुळे पेट्रोलचे भाव वाढत असताना, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे, ज्यामुळे लोक आश्चर्यचकित झाले आहे. या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, पेट्रोल पंपावर उभी असलेली एक व्यक्ती डिलिव्हरी एजंटना मोफत पेट्रोल देत आहे, ज्यमुळे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी झाली आहे. हा संपूर्ण प्रकार व्हिडिओमध्ये चित्रित करण्यात आला असून तो सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. आणि हा व्हिडिओ इंटरनेटवर चर्चेचा विषय बनला असून लोक त्यावर प्रतिक्रिया देत आहेत.

हेही वाचा: CBSE 10वी-12वी निकाल कधी लागणार? जाणून घ्या कुठे आणि कसा पाहायचा रिजल्ट

काय आहे संपूर्ण प्रकार पाहा

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वी ट्विटर) वर @ChapraZila या अकाउंटवरून व्हायरल होत असलेल्या व्हिडिओनुसार, असा दावा केला जात आहे की,एक व्यक्ती पेट्रोल पंपावर उभा राहून डिलिव्हरी एजंट्सना मोफत पेट्रोल देत आहे. असा दावा केला जात आहे की ही सुविधा विशेषतः फूड डिलिव्हरी करणाऱ्या लोकांसाठी आहे. ज्यामुळे पेट्रोल पंपावर मोठी गर्दी होते. हे दृश्य पाहून जवळ उभे असलेले लोक आश्चर्यचकित झाले आहेत. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर इंटरनेटवर चर्चा सुरू झाली आहे.

सोशल मीडियावर प्रतिक्रिया

हा व्हिडिओ हैदराबादचा असल्याचा अंदाज आहे. पण अद्याप देखील काही स्पष्ट झालेले नाही. व्हायरल व्हिडिओनंतर लोकांनी त्यावर विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत

एका यूजरने कमेंट केला, “हा कोण आहे जो लोकांच्या अडचणी समजून पेट्रोल देत आहे?”
दुसऱ्या यूजरने म्हटले, “नियमांनुसार वाहनाव्यतिरिक्त पेट्रोल दिले जाऊ शकत नाही.”
आणखी एका यूजरने म्हटले, “असं वाटतं भाईच्या हातात कुबेराचा खजिना लागला आहे किंवा पेट्रोल पंप त्याचं स्वतःचं आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts