Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • ताज्या बातम्या
  • चाहत्यांना धक्का! मंगळवेढ्यातील प्रसिद्ध रिलस्टारनी स्वतःच्या हॉटेलमध्ये केली आत्महत्या
गुन्हा

चाहत्यांना धक्का! मंगळवेढ्यातील प्रसिद्ध रिलस्टारनी स्वतःच्या हॉटेलमध्ये केली आत्महत्या

Mangalwedha Social Media Star Death: सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात धक्कादायक घटना घडली असून, प्रसिद्ध रिलस्टारने ब्रह्मपुरी येथील ‘हॉटेल ग्रामपंचायत’मध्ये आत्महत्या केली आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या रिल्स्टार रोहिणी पाराध्ये यांनी आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली असून परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवेढा तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे असलेल्या त्यांच्या हॉटेलच्या स्वयंपाकघरात त्यांनी गळफास घेतला. ही घटने मंगळवारी दुपारच्या सुमारास घडल्याचे सांगितले जात आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयानी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा : नीट विद्यार्थ्यांना दिलासा! फी रिफंडसाठी अर्जाची अंतिम मुदत वाढली; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

जीवनशैली आणि खाद्यसंस्कृतीवरील व्हिडीओमुळे प्रसिध्द

रोहिणी पाराध्ये आणि त्यांचे पती निलेश पाराध्ये हे सोशल मीडियावर ग्रामीण जीवनशैली आणि खाद्यसंस्कृतीवरील व्हिडीओमुळे प्रसिध्द झाले होते. ‘हॉटेल ग्रामपंचायत’ या नावाने त्यांनी व्यवसाय सुरू केला होता. त्यांच्या व्हिडीओंना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत होता.

चाहत्यांकडून श्रद्धांजली

या घटनेनंतर सोशल मीडिया वर्तुळात हळहळ व्यक्त केली जात असून चाहत्यांकडून श्रध्दांजली वाहिली जात आहे. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

जर तुम्ही किंवा तुमच्या ओळखीतील कोणी मानसिक तणावाचा सामना करत असेल, तर जवळच्या व्यक्तींशी संवाद साधा किंवा मानसिक आरोग्य तज्ज्ञांची मदत घ्या.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे. माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला. यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला. त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या. सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts