Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • शैक्षणिक बातम्या
  • नीट विद्यार्थ्यांना दिलासा! फी रिफंडसाठी अर्जाची अंतिम मुदत वाढली; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज
ताज्या बातम्या

नीट विद्यार्थ्यांना दिलासा! फी रिफंडसाठी अर्जाची अंतिम मुदत वाढली; ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

NTA Extends NEET UG 2026 Fee Refund Deadline

NTA Extends NEET UG 2026 Fee Refund Deadline: NEET UG 2026 फी रिफंड प्रक्रियेबाबत राष्ट्रीय परीक्षा संस्था (NTA) कडून महत्वाचे अपडेट जाहीर करण्यात आले आहे. फी परताव्यासाठी बँक तपशील सादर करण्याची अंतिम मुदत वाढवण्यात आली असून विद्यार्थ्यांना आता २२ जून २०२६ रात्री ११: ५० वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे.

यापूर्वी फी रिफंडसाठी बँक माहिती सादर करण्याची शेवटची तारीख २७ मे निश्चित करण्यात आली होती. मात्र बरेच विद्यार्थ्यांनी अद्याप प्रक्रिया पूर्ण न केल्याने एनटीएने मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइट neet.nta.nic.in वर जाऊन ऑनलाईन पद्धतीने आपले बँक तपशील अपडेट करणे आवश्यक आहे. फी परताव्याची रक्कम थेट संबंधित विद्यार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असल्याची माहिती एनटीएने दिली आहे.

एनटीएने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म “एक्स’ वर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली. आतापर्यंत सुमारे १३ लाख विद्यार्थांनी आपले बँक तपशील सबमिट केल्याचे संस्थेकडून सांगण्यात आले आहे. ज्यांनी अद्याप माहिती भरलेली नाही, त्यांनी विलंब न करता प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे.

इतर माहिती भरताना

एकदा बँक तपशील सबमिट केल्यानंतर त्यात बदल करता येणार नाही. त्यामुळे खाते क्रमांक, IFSC कोड आणि इतर माहिती भरताना काळजी घेण्याचा सल्ला विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.

या वेबसाईटला माहिती अपलोड करावी.

बँक तपशील सादर करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन ‘NEET 2026 Refund Portal’ या लिंकवर क्लिक करावे. त्यानंतर अर्ज क्रमांक आणि पासवर्ड किंवा जन्मतारीख वापरून लॉगिन करावे. पुढे आवश्यक बँक माहिती भरून अर्ज सबमिट करावा. आवश्यक असल्यास रद्द केलेल्या चेकची प्रतही अपलोड करावी लागेल.

ही फी रिफंड सुविधा फक्त त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे, ज्यांनी NEET UG 2026 साठी नोंदणी पूर्ण करून परीक्षा शुल्क भरले होते.

दरम्यान, NEET UG 2026 पुनर्परीक्षा २१ जून रोजी होणार असून परीक्षेदरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts