Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • पालकांनो, मुलांना हे फूड देताय? आधी थांबा! संशोधनातून समोर आलं धक्कादायक सत्य; जाणून घ्या नेमकं काय
फूड

पालकांनो, मुलांना हे फूड देताय? आधी थांबा! संशोधनातून समोर आलं धक्कादायक सत्य; जाणून घ्या नेमकं काय

Packaged Baby Food
0
Packaged Baby Food: मुलांसाठी बाजारातून पॅकेज्ड फूड खरेदी करताना पालकांनी आता अधिक सावध राहण्याची गरज आहे. कारण, एका नव्या संशोधनात लहान मुलांसाठी विकल्या जाणाऱ्या अनेक पदार्थांमध्ये अतिरिक्त साखर, सोडियम आणि अल्ट्रा-प्रोसेस्ड घटक आढळल्याचे समोर आले आहे. नेमकं या फूडमध्ये काय आढळलं? जाणून घ्या आजच्या खास लेखातून.

तुम्हीही लहान मुलांसाठी बाजारातून पॅकेज्ड फूड (Packaged Baby Food) आवर्जून खरेदी करता? मग जरा थांबा आणि ही बातमी नक्की वाचा! ‘लहान मुलांसाठी खास तयार केलेलं फूड म्हणजे हेल्दीच’ असा अनेक पालकांचा समज असतो. मात्र, नव्या संशोधनाने या समजाला मोठा धक्का दिला आहे. अमेरिकेतील किराणा दुकानांमध्ये ६ ते ३६ महिन्यांच्या मुलांसाठी उपलब्ध असलेल्या हजारो खाद्यपदार्थांची तपासणी करण्यात आली. यामध्ये तब्बल ८१ टक्के पदार्थ अल्ट्रा-प्रोसेस्ड (ultra processed food) असल्याचे समोर आले आहे. इतकंच नाही, तर जवळपास निम्म्या उत्पादनांनी जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) किमान एका पोषण निकषाची पूर्तता केली नसल्याचे आढळले.

हेही वाचा: भाऊ खास आहे, मग राखीही हटके हवी! यंदा ट्राय करा ‘हे’ अर्थपूर्ण पर्याय

म्हणजे पॅकेटवर ‘बेबी फूड’, ‘टॉडलर फूड’ किंवा आकर्षक हेल्दी दावे पाहून पदार्थ खरेदी करणाऱ्या पालकांनी आता अधिक काळजी घेण्याची गरज आहे. या पदार्थांमध्ये नेमकं काय असतं? साखर आणि सोडियम किती असतं? आणि मुलांसाठी फूड खरेदी करताना पालकांनी कोणत्या गोष्टी तपासाव्यात? जाणून घेऊया सविस्तर.

जवळपास २८०० उत्पादनांची तपासणी

संशोधकांनी अमेरिकेतील टेक्सासमधील २१ किराणा दुकानांमध्ये उपलब्ध असलेल्या २,७८३ पॅकेज्ड टॉडलर फूड्सचे परीक्षण केले. या अभ्यासात साखर, सोडियम, चरबी आणि कॅलरीचे प्रमाण तसेच उत्पादनांमध्ये वापरलेल्या घटकांचा अभ्यास करण्यात आला.

अभ्यासानुसार, १७ टक्के पदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण WHOच्या निकषांपेक्षा जास्त होते. तब्बल २५ टक्के उत्पादनांमध्ये सोडियमचे प्रमाण अधिक, ११ टक्के पदार्थांमध्ये चरबीचे प्रमाण जास्त आणि १२ टक्के उत्पादनांमध्ये ऊर्जा घनतेशी संबंधित निकष पूर्ण झाले नाहीत.

फळांच्या पाऊचपासून स्नॅक्सपर्यंत…

संशोधनात काही फळांचे पाऊच आणि ओट बारमध्ये साखरेचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. मॅकरोनी-अँड-चीजसारखे तयार पदार्थ आणि काही मांसाहारी स्नॅक्समध्ये सोडियम व चरबीचे प्रमाण जास्त होते. काही पीनट-बटर पफ्समध्येही सोडियम, चरबी आणि कॅलरीचे प्रमाण चिंताजनक असल्याचे संशोधकांनी नमूद केले. ( LS Marathi News Channel )

‘हेल्दी’ लेबल पाहून निर्णय घेऊ नका

तज्ज्ञांच्या मते, लहान मुलांसाठी तयार केले आहे किंवा पॅकेटवर हेल्दी, ऑर्गेनिक अथवा नैसर्गिक असा उल्लेख आहे म्हणून तो पदार्थ पौष्टिक असेलच असे नाही. उत्पादन खरेदी करण्यापूर्वी Nutrition Facts आणि Ingredients List तपासणे महत्त्वाचे आहे.

WHOच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार ६ ते ३६ महिन्यांच्या मुलांच्या खाद्यपदार्थांमध्ये अतिरिक्त साखर आणि कृत्रिम गोड पदार्थ टाळणे, तसेच सोडियम व संतृप्त चरबी मर्यादित ठेवणे महत्त्वाचे आहे.

घरच्या साध्या आहाराला प्राधान्य

तज्ज्ञांनी शक्य तितक्या वेळा मुलांना ताजी फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, डाळी, प्रथिनेयुक्त पदार्थ आणि वयाला योग्य असे पौष्टिक पर्याय देण्याचा सल्ला दिला आहे. पॅकेज्ड फूड पूर्णपणे बंद करणे हा एकमेव उपाय नसला तरी त्याचे प्रमाण आणि घटक याकडे पालकांनी लक्ष देणे गरजेचे आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts