Natural drink for glowing skin : सकाळी उठल्यावर कोफी किंवा चहाचे सेवन करण्यापेक्षा हे पेय पिल्यास तुमच्या चेहऱ्यावरील तेज तुम्हाला परत मिळू शकते. आयुर्वेदातही याचे महत्व प्रचंड आहे. तुम्हाला देखील दैनंदिन जीवनात बिझी आयुष्यामुळे स्वतःवर आणि स्वतःच्या चेहेऱ्यावर लक्ष द्यायला जमत नाही ना ? मग काही न करता फॅक्ट या पेयांचे सेवन करा चेहऱ्यावरील ग्लो आपसूक परत येईल. आणि तुम्हाला सर्वच जण विचारल्याशिवाय राहणार नाही या चेहऱ्यावरील तेज चा राज ?
आयुर्वेदात मेथी दाण्याला प्रचंड महत्व आहे. मेथी दाण्याला आयुर्वेदात चमत्कारिक औषध म्हणून ओळखले जाते. ज्याचा फायदा आपल्या आरोग्यावर आणि सौन्दर्यावर देखील होतो. एवढेच नाही तर केसांच्या मजबुतीसाठी देखील मेथी दाना फायदेशीर आहे. त्याच्या लहान बियांमध्ये फायबर लोह मॅग्नेशियम अँटीऑक्सीडेंट्स प्रचंड असतात. जर तुम्ही तुमच्या आरोग्यासाठी आणि चेहऱ्यावरील ग्लो साठी मेथी दाना रात्रभर पाण्यात भिजवून ठेवल्यास आणि तेच पाणी सकाळी रिकाम्या पोटी पिल्यास शरीराला याचा प्रचंड फायदा होईल. मेथी दानाच्या पाण्याचे सेवन केल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल. याशिवाय केसांना मजबुती मिळेल.
पचनसंस्था सुधारण्यासाठी देखील मेथीदाणे फायदेशीर
तुमची पचनसंस्था सुधारण्यासाठी देखील मेथीदाणे फायदेशीर आहे. मेथी दाण्याचे पाणी गॅस, अपचन, आम्लपित्त आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी अत्यंत प्रभावी पर्याय आहे. हे पाणी पिल्यास शरीरातील आतडे स्वच्छ होतात आणि पचन देखील चांगले होते. तर चयापचन गतिमान होण्यास आणि भूक नियंत्रीत ठेवण्याचे देखील कार्य करते. यामुळे शरीरातील अतिरिक्त फॅट कमी होण्यास फायदा होतो.
इन्सुलिनची कार्यक्षमता वाढण्यासही फायदा
जर तुम्हाला मधुमेह असेल. आणि तुम्हाला तो नियंत्रणात आणायचा असेल तर मॆठी दाण्याच्या पाण्याचे सेवन करा. कारण मेथी दाणे रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. आणि इन्सुलिनची कार्यक्षमता वाढण्यासही फायदा होतो. याशिवाय कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी देखील हे पाणी फायदेशीर आहे. कोलेस्ट्रॉल चांगले असेल तर तुमचे हृदय निरोगी राहू शकते.
मासिक पाळीच्या काळात हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी फायदेशीर
महिलांमध्ये पीसीओडी, थायरॉईड यांचे प्रमाण जास्त असते. यासोबतच मासिक पाळीच्या काळात हार्मोन्स संतुलित ठेवण्यासाठी मेथी दाणे एक उत्तम उपाय आहे. या समस्या दूर करण्यासाठी मेथी दाण्याचे पाणी सेवन केल्यास फायदा होतो. याशिवाय या पाण्यात असलेले सूज कमी करणारे गुणधर्म हे सांधेदुखी कमी करण्यास फायदेशीर ठरते.
कोंड्याची समस्येचे देखील निराकरण (Natural drink for glowing skin)
शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठी मेथी दाणे मदत करतात. यामुळे तुमची त्वचा स्वच्छ करण्यासोबतच चमकदार देखील बनते. हे पाणी केसांच्या मुळांना पोषण देण्यापासून केस गळती, कोंड्याची समस्येचे देखील निराकरण करते. तुम्ही दैनंदिदीं जीवनात रोज हे पाणी पिल्यास तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढेल.









