Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • हिवाळ्यात गुलाबी आणि मऊ ओठांसाठी करा हे नैसर्गिक उपाय; केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सपेक्षाही मिळेल अप्रतिम फायदा
लाईफस्टाईल

हिवाळ्यात गुलाबी आणि मऊ ओठांसाठी करा हे नैसर्गिक उपाय; केमिकलयुक्त प्रॉडक्ट्सपेक्षाही मिळेल अप्रतिम फायदा

Natural Remedies for Pink Lips

Natural Remedies for Pink Lips : तुम्ही जेव्हा सकाळी उठून आरशात बघतात तेव्हा तुम्हाला तुमचे ओठ कोरडे, फाटलेले आणि काळपट वाटतात का? लिपस्टिक, बदलणारे वातावरण, प्रदूषण या सर्वांचा परिणाम ओठांवर आणि चेहऱ्यावर जाणवत असतो. थंडीच्या दिवसात तर खासकरून ओठांची काळजी घ्यावी लागते. कारण सूंदर चेहऱ्यासोबतच ओठांची सुंदरता देखील महत्वपूर्ण असते. त्यासाठी कोणत्याही महागड्या कॉस्मेटिक प्रॉडक्ट्सची गरज नसते. तर आपल्या स्वयंपाकघरात उपलब्ध असलेल्या वस्तूंचा वापर करून आपण आपल्या चेहऱ्याची चमक वापस आणू शकतो.

आपल्या चेहऱ्यापेक्षा ओठांची त्वचा ही फार नाजूक असते. ओठांमध्ये शरीरातील इत्तर भागांमध्ये असलेल्या तेलग्रंथी नसतात. म्हणूनच ओठ लावक्फर कोरडे होतात. आपण ओठ कोरडे पडू नये म्हणून बऱ्याचदा ओठांवरून जीभ फिरवतो. परंतु ओठ कोरडे पडण्याचे मुख्य कारण तेच आहे. याशिवाय दैनंदिन जीवनात पुरेसे पाणी पिणे, धूम्रपान करणे, चहा कॉफीचे अतिसेवन करणे अशी अनेक कारणे ओठांच्या सौन्दर्याला जबाबदार असतात. थंडी आणि सूर्यप्रकाश यांच्यामुळे नैसर्गिक रंग निघून जातो. एवढेच नाही तर कमी झोप आणि पोषणाची कमतरता देखील यासाठी कारणीभूत आहे.

मध आणि साखरेचा स्क्रब

तुम्ही घरच्या घरी गुलाबी आणि मऊ ओठांसाठी नैसर्गिक उपाय आजमावू शकतात. जसे की मध आणि साखर यांचं मिश्रण असलेला स्क्रब. मध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर आहे. आणि साखर हे चेहऱ्यावरील मृत त्वचा काढून टाकण्यासाठी उत्तम पर्याय आहे. त्यानुसार एक चमचा मध घ्या. या मधात अर्धा चमचा साखर टाका. हे मिश्रण एकत्र करून ते ओठांवर लावा. त्यानंतर हलक्या हाताचा वापर करून 1 ते 2 मिनिटांसाठी ओठांवर स्क्रब करा. त्यानंतर कोमट पाण्याने धुवून घ्या. असे केल्यास तुमच्या ओठांवरील डेड स्क्रीन निघून जाईल. तुम्ही आठवड्यातून 2 वेळेस असे केल्यास तुमचे ओठ गुलाबी आणि मऊ होतील.

तूप किंवा लोणी

आपल्या आजोबा पंजोबांच्या काळापासून तुपाचे फायदे आपल्याला सांगितले जातात. तूप वापरण्याची परंपरा तेव्हापासून सुरूच आहे. तुम्ही झोपण्यापूर्वी ओठांवर थोडे तूप किंवा लोणी लावा. यामुळे रात्रभर तुमच्या ओठांना पोषण मिळेल. आणि तुमचे ओठ मऊ दिसतील. हिवाळ्यात हा उपाय फायदेशीर आहे.

हे ही वाचा : तुम्हालाही हवी ग्लास स्क्रीन; मग महागातले ट्रीटमेंट विसरा करा या पद्धतीचा वापर

बीट

बीटरूटमध्ये नैसर्गिक रंग असतो. बीटरूटचा रस तयार करून कापसाच्या बोळ्याने ओठांवर लावा. 15 ते 20 मिनिटांनी धुवून घ्या. बीटरूटचा वापर जर तुम्ही रोज केला तर तुमच्या ओठांवर नैसर्गिक गुलाबी रंग येईल.

नारळ तेल

नारळ तेलामध्ये अँटी बॅक्टेरियल गुणधर्म असतात. म्हणून नारळतेल ओठांसाठी फायदेशीर ठरते. तुम्ही जर दिवसातून 2 ते 3 वेळेस ओठांवर नारळ तेल लावल्यास ओठ नरम आणि मऊ होतील. ओठ कोरडे पडणार नाही. तसेच फाटलेले ओठ लवकर बरे होतील.

गुलाबपाणी आणि ग्लिसरीन

गुलाबपाणी आणि ग्लिसरीन हे ओठांना ओलावा प्रदान करतात. त्यानुसार जर तुम्ही गुलाबपाण्यात ग्लिसरीन मिक्स करून झोपण्यापूर्वी ओठांवर लावल्यास ओठांचा नैसर्गिक रंग परत मिळू शकतो.

कोरफड जेल

चेहऱ्यासाठी अत्यंत गुणकारी असलेली कोरफड ही ओठांसाठी देखील फायदेशीर आहे. ओठांवर कोरफडचा जेल लावल्यास ओठ मऊ होण्यास मदत होईल. याशिवाय ओठ काळपट पडता नैसर्गिक चमक परत येईल.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts

हळदाची पाने : आयुर्वेदिक गुणांचा अनमोल खजिना हल्लीम (Garden Cress Seeds): आरोग्यासाठी नैसर्गिक सुपरफूड स्नायूंची ताकद वाढवायची? रोज खा हे ७ प्रोटीन सुपरफूड्स! स्ट्रॉबेरी: गोड लाल आरोग्यदायी फळ सुंठ (Dry Ginger): आरोग्याचा खजिना