Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • लिंबू, कॉफीसारख्या गोष्टी त्वचेवर लावताय? ठरू शकतं घातक, जाणून घ्या साइड इफेक्ट्स
ताज्या बातम्या

लिंबू, कॉफीसारख्या गोष्टी त्वचेवर लावताय? ठरू शकतं घातक, जाणून घ्या साइड इफेक्ट्स

Skin Care Tips | आजकाल बऱ्याच तरूण, तरूणींना पिंपल्स (Pimples), काळे डाग (Black Spot), वांग (Pigmentation) अशा अनेक समस्या निर्माण होताना दिसतात. त्यामुळे आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी बरेच लोक स्वयंपाकघरातील नैसर्गिक घटकांचा वापर करत असतात. मात्र, प्रत्येकाने हे लक्षात घेतलं पाहिजे की, सर्वच नैसर्गिक घटक त्वचेसाठी सुरक्षित नसतात. चुकीच्या पद्धतीने किंवा अतिप्रमाणात वापरल्यास, हे घरगुती उपाय फायद्याऐवजी नुकसान करू शकतात. त्यामुळे आता आपण स्वयंपाकघरातील कोणते घटक त्वचेसाठी धोकादायक ठरू शकतात आणि त्यांचा वापर विचारपूर्वक का केला पाहिजे, हे जाणून घेणार आहोत.

हेही वाचा – 10. चेहऱ्यावरील वांग घालवण्यासाठी नैसर्गिक उपाय; घरच्या घरी करा ‘हा’ फेस पॅक

कोणत्या गोष्टी त्वचेसाठी ठरू शकतात घातक?

लिंबाचा रस – बरेचजण चेहऱ्यावर लिंबाच्या रसाचा वापर मोठ्या प्रमाणात करत असतात. पण तुम्हाला माहिती आहे का की हाच लिंबाचा रस तुमच्या त्वचेला हानी पोहोचवू शकतो. कच्चा लिंबू थेट चेहऱ्यावर चोळल्याने किंवा लिंबाचा रस चेहऱ्यावर लावल्याने त्वचेला नुकसान पोहोचू शकते. यामुळे त्वचेतील नैसर्गिक ओलावा कमी होतो आणि त्वचेचा पीएच समतोल बिघडतो, ज्यामुळे त्वचेवर कोरडेपणा, तीव्र जळजळ लालसरपणा येऊ शकतो.

बेकिंग सोडा – चेहऱ्यावर बेकिंग सोडा लावणे त्वचेसाठी खूप हानिकारक ठरू शकते. त्यामुळे त्वचेचा पीएच बॅलन्स बिघडू शकतो. तसेच बरेचजण बेकिंग सोड्याचा वापर एक स्क्रब म्हणून करतात. मात्र, यामुळे चेहऱ्यावर जळजळ होते आणि कोरडेपणा वाढू शकतो. तसेच त्वचेच्या नुकसान पोहोचू शकते. चेहऱ्यावरील मुरुमे कमी होण्याऐवजी, ती आणखी वाढू शकतात.

कॉफी आणि साखर – साखर आणि कॉफी तुमच्या त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. साखर आणि कॉफी ही काचेच्या लहान, टोकदार तुकड्यांसारखे दिसतात. ते त्वचेच्या छिद्रांमध्ये जोरात घासल्याने लहान ओरखडे येऊ शकतात. यामुळे तुमच्या त्वचेतील ओलावा झपाट्याने कमी होतो, त्वचा अत्यंत कोरडी होते आणि अकाली वृद्धत्वाचा धोका वाढतो.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts