Breaking News :
  • Home
  • गुन्हा
  • dyanesh Kumar Protest : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात १ नोव्हेंबरला विरोधकांची रॅली; रामलीला मैदानावर शक्तिप्रदर्शन
गुन्हा

dyanesh Kumar Protest : मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात १ नोव्हेंबरला विरोधकांची रॅली; रामलीला मैदानावर शक्तिप्रदर्शन

dyanesh Kumar Protest
3
dyanesh Kumar Protest :  मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी विरोधी पक्षांनी दिल्लीतील रामलीला मैदानावर १ नोव्हेंबर रोजी मोठ्या रॅलीचे आयोजन केले आहे. काँग्रेससह विविध विरोधी पक्षांचे नेते या आंदोलनात सहभागी होण्याची शक्यता असून, या आंदोलनातून निवडणूक आयोगाच्या कामकाजाबाबतचे आक्षेप मांडले जाणार आहेत.  

मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी काँग्रेससह विरोधी पक्षांनी दिल्लीमध्ये मोठ्या आंदोलनाची घोषणा केली आहे. येत्या १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर ही रॅली (Ramlila Graden) आयोजित करण्यात येणार असून, तिला ‘जनमहाभियोग’ असे नाव देण्यात आले आहे. मतदार यादीतील (Voter List) कथित अनियमितता, विशेष सखोल पुनरीक्षण म्हणजेच SIR प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर या आंदोलनात प्रश्न उपस्थित केले जाणार आहेत. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी या आंदोलनाची घोषणा केली असून, विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

SIR प्रक्रियेवरून निवडणूक आयोगाला विरोधकांचा सवाल

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेवर (Special Intensive Revision – SIR) विरोधकांनी आक्षेप घेतला आहे. या प्रक्रियेमुळे मोठ्या प्रमाणात मतदारांची नावे वगळली जात असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात येत आहे. मतदार यादीत कथित फेरफार होत असल्याचा आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेवर प्रश्न निर्माण होत असल्याचा दावा विरोधकांनी केला आहे. या प्रकरणाची जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर निश्चित करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. (Chief Election Commissioner)

राहुल गांधींचे नागरिकांना आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सोशल मीडियावर व्हिडीओ (Social Media Vedio) संदेश प्रसिद्ध करून १ नोव्हेंबरच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. हे आंदोलन केवळ राजकीय पक्षापुरते मर्यादित नसून लोकशाही आणि संविधानाच्या रक्षणासाठी असल्याची भूमिका त्यांनी मांडली आहे. विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांनीही या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. (Opposition Rally Delhi)

हेही वाचा :    SIR म्हणजे काय? मतदार यादीच्या पुनरीक्षणावरून देशभर वाद; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी का होतेय?

INDIA आघाडीतील पक्ष एकत्र येणार?

काँग्रेसच्या नेतृत्वाखाली होणाऱ्या या आंदोलनात INDIA आघाडीतील विविध विरोधी पक्ष सहभागी होण्याची अपेक्षा आहे. मल्लिकार्जुन खरगे (Mallikarjun Kharge)  यांच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची रणनीती आखली जात असून, मतदार यादीतील कथित अनियमिततेचा मुद्दा देशभरातील मतदारांपर्यंत पोहोचवण्याचा विरोधकांचा प्रयत्न आहे. या आंदोलनात SIR प्रक्रियेची पारदर्शकता, मतदारांची नावे वगळल्याचे आरोप आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जाण्याची शक्यता आहे.

महाराष्ट्रातील विरोधकही दिल्लीत सहभागी होणार?

ज्ञानेश कुमार (dyanesh Kumar) आणि SIR प्रक्रियेच्या विरोधात महाराष्ट्रातही राजकीय पक्षांनी आंदोलने केली आहेत. यापूर्वी मुंबईत उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला होता. त्यामुळे १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या आंदोलनात (farmer Protest)महाराष्ट्रातील विरोधी पक्षांचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी होणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

दरम्यान, ‘जनमहाभियोग’ या नावाने आयोजित करण्यात आलेल्या या आंदोलनातून विरोधक निवडणूक आयोगाविरोधातील आपली भूमिका किती प्रभावीपणे मांडतात आणि त्यांच्या मागण्यांवर सत्ताधारी पक्ष तसेच निवडणूक आयोगाकडून काय प्रतिक्रिया येते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. (Election Commission Controversy)

हेही वाचा :  राहुल गांधींचा दिल्लीतील एल्गार! इंडिया आघाडीचं आंदोलन यशस्वी की केवळ शक्तिप्रदर्शन? जाणून घ्या सविस्तर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts