INDIA Alliance Press Conference: निवडणूक आयोगाविरोधात इंडिया आघाडीची संयुक्त पत्रकार परिषद सुरू. राहुल गांधी, मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह विरोधी पक्षांचे नेते पुढील आंदोलनाची रणनीती आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत भूमिका मांडण्याची शक्यता आहे.
नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत (INDIA Alliance) इंडिया आघाडीच्या नेत्यांची संयुक्त पत्रकार परिषद सुरू झाली आहे. लोकसभेतील विरोधी पक्षनेते (Rahul Gandhi) राहुल गांधी यांच्या निवासस्थानी आयोजित बैठकीनंतर ही पत्रकार परिषद होत आहे. (Election Commission) मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी आणि कथित ‘व्होट चोरी’च्या मुद्द्यावर पुढील आंदोलनाची दिशा यावेळी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी सोमवारी (१२ ऑक्टोबर) दिल्लीत ‘मार्च फॉर डेमोक्रसी’ काढला होता. त्यानंतर निवडणूक प्रक्रियेतील कथित अनियमिततेच्या मुद्द्यावर सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्याची प्रक्रिया करण्यात आली. या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांच्या पुढील रणनीतीकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे.
या पत्रकार परिषदेत इंडिया आघाडीचे नेते निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. तसेच, पुढील आंदोलन, विरोधकांची एकजूट आणि निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबाबत काय भूमिका घेतली जाणार, याबाबतही महत्त्वाची माहिती समोर येऊ शकते.









