• Home
  • ताज्या बातम्या
  • अभिजित दिपकेंना विमानातूनच ताब्यात घेतलं; पोलीस आले तेव्हा काय घडलं?
Delhi

अभिजित दिपकेंना विमानातूनच ताब्यात घेतलं; पोलीस आले तेव्हा काय घडलं?

अभिजित दिपके पोलिसांच्या ताब्यात!
113
Abhijit Dipke Detained: दिल्ली विमानतळावर विमान उतरताच पोलिसांनी कारवाई करत CJP चे संस्थापक अभिजित दिपके यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांना ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.

आज, १० ऑक्टोबर रोजी दिल्लीतील जंतर-मंतर येथे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आंदोलन करण्यासाठी अभिजित दिपके (Abhijit Dipke) यांच्यासह सौरव दास (Saurav Das) आणि आशुतोष रांका (Ashutosh Ranka) दिल्लीला पोहोचले होते. विमान विमानतळावर उतरताच पोलीस विमानात दाखल झाले आणि त्यांनी तिघांनाही ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे.

या संपूर्ण घडामोडीदरम्यान अभिजित दिपके यांनी इन्स्टाग्रामवर लाइव्ह येत पोलिसांना उद्देशून, “आम्ही अटक होण्यासाठीच आलो आहोत. अटक करा आम्हाला,” असे म्हटल्याची माहिती आहे.

हेही वाचा: मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करताय? ‘या’ गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल

या घटनेमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. यावेळी दिपके यांनी, “तरुणांची एवढी भीती वाटत असेल, तर देश बंद करा,” अशी आक्रमक प्रतिक्रिया दिल्याचेही सांगितले जात आहे.

दरम्यान, या कारवाईमागील नेमके कारण काय, तसेच पोलिसांनी त्यांना कोणत्या कारणासाठी ताब्यात घेतले, याबाबत अधिकृत माहिती समोर येणे बाकी आहे.

img

नमस्कार, मी मोनिका मारुती शिंदे. पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया क्षेत्रात गेली ४ वर्षे कार्यरत असून विविध माध्यमांमध्ये काम करण्याचा अनुभव मला मिळाला आहे.माझ्या करिअरची सुरुवात २०२३ मध्ये सोलापूरमधील एका लोकल यूट्यूब चॅनेलमध्ये एडिटर म्हणून झाली. येथे ६ महिने काम करताना व्हिडिओ एडिटिंग आणि डिजिटल कंटेंट निर्मितीचा अनुभव घेतला.यानंतर २ ऑक्टोबर २०२३ रोजी मी सकाळमध्ये रिपोर्टर म्हणून ऑन-फिल्ड काम करण्यास सुरुवात केली. बातम्यांचे कव्हरेज, ग्राउंड रिपोर्टिंग आणि लोकांशी संवाद साधण्याचा अनुभव येथे मिळाला.त्यानंतर मी दीड वर्ष eSakal मध्ये नॉन-सेक्शनमध्ये शैक्षणिक बीटवरील बातम्यांवर काम केले. शिक्षण क्षेत्राशी संबंधित विविध घडामोडी, अपडेट्स आणि विशेष बातम्या हाताळल्या.सध्या, ५ मार्चपासून मी LS मराठीच्या Loksevay या वेबसाईटमध्ये कंटेंट प्रोड्युसर म्हणून कार्यरत असून डिजिटल न्यूज कंटेंट निर्मितीचे काम करत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts