Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • World Mental Health Day 2026: 10 ऑक्टोबरलाच का साजरा होतो जागतिक मानसिक आरोग्य दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व!
लाईफस्टाईल

World Mental Health Day 2026: 10 ऑक्टोबरलाच का साजरा होतो जागतिक मानसिक आरोग्य दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व!

World Mental Health Day 2026
World Mental Health Day 2026: दरवर्षी १० ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन (World Mental Health Day) साजरा केला जातो. पण हा दिवस साजरा करण्यामागचं नेमकं कारण काय आणि त्याचं महत्त्व काय आहे? चला तर, जाणून घेऊया आजच्या खास लेखातून!

World Mental Health Day 2026: दरवर्षी प्रमाणे यंदाही १० ऑक्टोबर हा दिवस जगभरात ‘ जागतिक मानसिक आरोग्य दिन’ (World Mental Health Day) म्हणून साजरा केला जातो. आजच्या धावपळीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत मानसिक आरोग्यविषयी जागरूकता निर्माण करणे ही काळाची गरज बनली आहे. शारीरिक आजारांवर (Mental Wellness) आपण उघडपणे बोलतो आणि डॉक्टरांकडे जातो, पण मानसिक आरोग्याबाबत अजूनही समाजात अनेक गैरसमज आणि संकोच दिसून येतो. (Mental Health News)

पण हा दिवस १० ऑक्टोबरलाच (Mental Health Day October 10) का साजरा केला जातो? यामागचा इतिहास काय आहे? चला, याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

हेही वाचा: मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करताय? ‘या’ गंभीर आजारांना सामोरे जावे लागेल

१० ऑक्टोबरलाच का साजरा केला जातो हा दिवस?

जागतिक मानसिक आरोग्य दिन पहिल्यांदा १० ऑक्टोबर १९९२ रोजी साजरा करण्यात आला होता. ‘वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ’ (WFMH) या जागतिक संस्थेने या दिवसाची सुरुवात केली.

उपसरचिटणीस रिचर्ड हंटर यांचा पुढाकार

१९९२ मध्ये WFMH चे तत्कालीन उपसरचिटणीस रिचर्ड हंटर (Richard Hunter) यांनी जागतिक स्तरावर मानसिक आरोग्याविषयी जागरूकता पसरवण्यासाठी एका विशिष्ट दिवसाची स्थापना करण्याची संकल्पना मांडली.

वार्षिक संकल्पना (Theme) ची सुरुवात

पहिल्या दोन वर्षांत या दिवसासाठी कोणतीही विशिष्ट थीम (संकल्पना) नव्हती. परंतु १९९४ मध्ये तत्कालीन संयुक्त राष्ट्रांचे (UN) सरचिटणीस युजीन ब्रॉडी यांच्या सूचनेनुसार “Improving the Quality of Mental Health Services Throughout the World” या पहिल्या अधिकृत थीमसह हा दिवस साजरा करण्यात आला.

तेव्हापासून दरवर्षी १० ऑक्टोबर हा दिवस जागतिक स्तरावर मानसिक आरोग्यासाठी समर्पित दिवस म्हणून निश्चित करण्यात आला.

हेही वाचा: अभिजित दिपकेंना विमानातूनच ताब्यात घेतलं; पोलीस आले तेव्हा काय घडलं?

जागतिक मानसिक आरोग्य दिन २०२६ ची थीम काय आहे? (World Mental Health Day Theme)

२०२६ मध्ये जागतिक मानसिक आरोग्य दिनाची थीम ‘Lived Experiences Heard: Real Voices, Real Change’ अशी आहे. याचा साधारण अर्थ म्हणजे ‘अनुभवांना मिळू दे आवाज, घडू दे सकारात्मक बदल’ असा होतो.

या वर्षीच्या थीममध्ये मानसिक आरोग्याच्या समस्यांचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्या व्यक्तींचे अनुभव ऐकणे आणि त्यांच्या मतांना महत्त्व देणे यावर भर देण्यात आला आहे.

जागतिक मानसिक आरोग्य दिनाचा इतिहास (World Mental Health Day History)

‘वर्ल्ड फेडरेशन फॉर मेंटल हेल्थ’ (WFMH) ची स्थापना १९४८ मध्ये झाली होती. मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या लोकांना योग्य उपचार मिळावेत आणि समाजात त्यांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा, यासाठी ही संस्था काम करते.

१९९२ मध्ये जेव्हा हा दिवस सुरू झाला, तेव्हा जागतिक आरोग्य संघटना (WHO) आणि संयुक्त राष्ट्रांनी (UN) त्याला पाठिंबा दिला. आज जगभरातील १५० हून अधिक देशांमध्ये विविध कार्यक्रम, कार्यशाळा आणि मोहिमांच्या माध्यमातून १० ऑक्टोबरला मानसिक आरोग्याविषयी जनजागृती केली जाते.

हेही वाचा: Lucky Zodiac Signs 10 October 2026: १० ऑक्टोबरला पितरांचा आशीर्वाद की नशिबाची साथ? सर्वपित्री अमावस्येला ‘या’ राशींची चर्चा!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts