Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • अंबाबाईच्या नवरात्रोत्सवासाठी कोल्हापूर सज्ज! वाहतुकीत मोठे बदल; अवजड वाहनांना बंदी, पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था
महाराष्ट्र

अंबाबाईच्या नवरात्रोत्सवासाठी कोल्हापूर सज्ज! वाहतुकीत मोठे बदल; अवजड वाहनांना बंदी, पार्किंगसाठी स्वतंत्र व्यवस्था

Kolhapur Ambabai Navratri 2026
कोल्हापूर | निरंजन कामत,प्रतिनिधी
Kolhapur Ambabai Navratri 2026: कोल्हापुरातील श्री अंबाबाई देवीच्या नवरात्रोत्सवासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

कोल्हापूरच्या श्री अंबाबाई देवीच्या नवरात्रोत्सवासाठी (Kolhapur Ambabai Navratri 2026) शहरात भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन वाहतूक (Kolhapur Traffic Changes) व्यवस्थेत महत्त्वाचे बदल करण्यात आले आहेत. ११ ते २० ऑक्टोबर २०२६ या कालावधीत शहरातील प्रमुख मार्गांवर वाहतुकीचे निर्बंध लागू राहणार असून, अवजड वाहनांच्या प्रवेशावरही अतिरिक्त बंदी घालण्यात आली आहे. भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी विविध ठिकाणी बस आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र पार्किंगची (Ambabai Temple Traffic Rules) व्यवस्था करण्यात आली आहे. कोल्हापूर शहर वाहतूक नियंत्रण शाखेचे पोलीस निरीक्षक नंदकुमार मोरे यांनी वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी हे नियोजन केले आहे.

हेही वाचा: अभिजित दिपकेंना विमानातूनच ताब्यात घेतलं; पोलीस आले तेव्हा काय घडलं?

मंदिर परिसरात वाहनांना निर्बंध

नवरात्रोत्सवाच्या (Kolhapur Navratri Festival) काळात अंबाबाई मंदिर परिसरातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी पुढील वाहतूक बदल लागू करण्यात आले आहेत.

अवजड वाहनांना प्रवेशबंदी

शहरात सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत अवजड वाहनांना नेहमीप्रमाणे प्रवेशबंदी असेल. उत्सवातील गर्दी लक्षात घेऊन रात्री ८ ते १० या वेळेत सीपीआर चौक, दसरा चौक, रंकाळा स्टँड, तोरस्कर चौक आणि जुना वाशी नाका यांसारख्या प्रमुख चौकांमध्येही अवजड वाहनांना प्रवेश करता येणार नाही. LS Marathi News Channel 

रिक्षांसाठी मार्गबदल

बिनखांबी महाद्वार रोड ते पापाची तिकटी या मार्गावर दुपारी ४ ते रात्री १० या वेळेत रिक्षांना प्रवेश बंद राहील.
महाद्वार रोडवर चारचाकींना बंदी: नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत महाद्वार रोडवर चारचाकी वाहनांना पूर्णपणे प्रवेशबंदी असेल.

दुचाकी व इतर वाहनांवर निर्बंध

प्रथमेश ऑईल स्पेअर पार्ट कॉर्नर ते बालगोपाल तालीम या मार्गावर दुचाकी आणि इतर वाहनांना प्रवेश बंद राहील. स्थानिक रहिवासी आणि अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे.

एकेरी मार्गाचे पालन आवश्यक

भवानी मंडप कमान ते बिंदू चौक कमान (जेल रोड) या एकेरी मार्गावर विरुद्ध दिशेने वाहन चालवण्यास मनाई असेल.

केएमटी बसच्या मार्गात बदल

नवरात्रोत्सवात भाविकांची गर्दी आणि वाहतूक कोंडी टाळण्यासाठी सकाळी ८ ते रात्री १० या वेळेत केएमटी बसच्या मार्गात बदल करण्यात आला आहे.

या वेळेत बिंदू चौक ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा या मार्गाने जाण्याऐवजी बस बिंदू चौक – आईसाहेब महाराज पुतळा – स्वयंभू गणेश मंदिर या पर्यायी मार्गाने धावतील.

याशिवाय भवानी मंडप, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि माधुरी बेकरी येथील रिक्षा थांबे नवरात्रोत्सवाच्या काळात बंद राहतील.

हेही वाचा: World Mental Health Day 2026: 10 ऑक्टोबरलाच का साजरा होतो जागतिक मानसिक आरोग्य दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व!

बाहेरगावच्या बससाठी स्वतंत्र थांबे

महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांसह कर्नाटकातून येणाऱ्या भाविकांच्या वाहनांची गर्दी शहराच्या मध्यवर्ती भागात होऊ नये, यासाठी मार्गानुसार बस पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे.

पुणे, सातारा आणि सांगलीकडून येणाऱ्या बसेस: १०० फुटी रोड, एस्तेर पॅटर्न (E.P.) शाळेचे मैदान आणि अमेरिकन बंगलो परिसर.
कर्नाटक, कागल, बेळगाव, कळंबा आणि राधानगरीकडून येणाऱ्या बसेस: निर्माण चौक, तपोवन मैदान आणि शाहू दयानंद हायस्कूलचे मैदान.
कोकण आणि गगनबावड्याकडून येणाऱ्या बसेस: क्रशर चौक आणि रंकाळा रोडवरील राज कपूर पुतळ्याजवळ रस्त्याच्या कडेला.
रत्नागिरी आणि शाहूवाडीकडून येणाऱ्या बसेस: पंचगंगा घाट पार्किंग.

Kolhapur Ambabai Navratri 2026
Kolhapur Ambabai Navratri 2026

चारचाकी वाहनांसाठी कुठे असेल पार्किंग?

मंदिरात दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना आपली वाहने सुरक्षितपणे उभी करता यावीत, यासाठी शहरातील विविध ठिकाणी पार्किंगची सोय करण्यात आली आहे.

चारचाकी वाहनांसाठी बिंदू चौक, व्हीनस कॉर्नर येथील पे अँड पार्क, शिवाजी स्टेडियम परिसर, प्रायव्हेट हायस्कूल, गांधी मैदान, पेटाळा, सरस्वती टॉकीज बहुमजली पार्किंग आणि ससूर बाग शाळा येथे पार्किंगची व्यवस्था असेल.

तर व्हीआयपी आणि व्हीव्हीआयपी वाहनांसाठी विद्यापीठासमोरील पटांगणात पार्किंगची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

हेही वाचा: CJP Jantar Mantar Delhi Protest Live: दिल्लीमध्ये कडेकोट सुरक्षा, अभिजीत दीपके आंदोलनावर ठाम; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी

भाविकांनी वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन

नवरात्रोत्सवासाठी राज्याच्या विविध भागांतून तसेच परराज्यांतून मोठ्या संख्येने भाविक कोल्हापुरात दाखल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहनचालकांनी निर्धारित मार्गांचा वापर करावा, वाहतूक पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे आणि शक्यतो पर्यायी पार्किंगचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत प्रवास करता यावा, तसेच शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत राहावी, यासाठी वाहतूक पोलिसांकडून विशेष नियोजन करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts