Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • शिक्रापूरमध्ये चोरट्यांचा हैदोस! एकाच रात्री १३ दुकाने फोडली; सीसीटीव्हीत शस्त्रधारी चोरटे कैद
गुन्हा

शिक्रापूरमध्ये चोरट्यांचा हैदोस! एकाच रात्री १३ दुकाने फोडली; सीसीटीव्हीत शस्त्रधारी चोरटे कैद

Shikrapur Theft Case
शिरूर । सचिन धुमाळ, प्रतिनिधी

Shikrapur Theft Case: शिरूर तालुक्यातील शिक्रापूर परिसरात (Shikrapur Theft Case) चोरट्यांनी एकाच रात्री तब्बल १३ दुकाने (13 Shops Robbed)  फोडल्याची धक्कादायक माहितीनी समोर (Shikrapur Crime News) आली आहे. मेडिकल, ज्वेलर्स(Jewellery Shop Theft) , कपड्यांचे दुकान (Gas Agency Theft) आणि गॅस एजन्सीसह (Shikrapur Latest News) विविध व्यावसायिक आस्थापनांना चोरट्यांनी लक्ष्य केले. विशेष म्हणजे, काही दुकानांच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये हातात शस्त्रे घेऊन फिरणारे चोरटे कैद झाल्याची माहिती समोर (Marathi Crime News) आली आहे. या घटनेमुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्याचे आव्हान शिक्रापूर पोलिसांसमोर उभे राहिले आहे. (Maharashtra Crime News)

पाबळ चौकात चोरीचा प्रकार उघड

शिक्रापूरमधील व्यापारी नेहमीप्रमाणे रात्री दुकाने बंद करून घरी गेले होते. दुसऱ्या दिवशी सकाळी पिंपळे खालसा येथील वृत्तपत्र विक्रेते दादा गोडसे हे पाबळ चौकातून जात असताना त्यांना पलांडे मेडिकलचे शटर उचकटल्याचे दिसले. त्यांनी तत्काळ मेडिकलचे चालक तानाजी पलांडे यांना याबाबत कळवले.

हेही वाचा: World Mental Health Day 2026: 10 ऑक्टोबरलाच का साजरा होतो जागतिक मानसिक आरोग्य दिन? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व!

दुकानात जाऊन पाहणी केली असता, चोरट्यांनी शटर उचकटून मोबाईल आणि रोख रक्कम चोरून नेल्याचे निदर्शनास आले. यानंतर परिसरातील इतर दुकानांची तपासणी केली असता, आणखी दुकाने फोडल्याचे उघड झाले. पाहता पाहता एकाच रात्री १३ दुकाने फोडल्याचा प्रकार समोर आला.

मेडिकल, ज्वेलर्ससह १३ दुकानांना लक्ष्य

चोरट्यांनी शिक्रापूर परिसरातील विविध व्यावसायिक आस्थापनांमध्ये चोरी केली. यामध्ये पलांडे मेडिकल, न्यू साई मेडिकल, जय मल्हार मेडिकल, राजविका मेडिकल, सह्याद्री मेडिकल, श्री स्वामी समर्थ मेडिकल, शांताई मेडिकल, लीलावती मेडिकल, कल्याणी मेडिकल, वीरा ज्वेलर्स, केक हाईट्स शॉप, एसी ज ब्रँड फॅब्रिक आणि करंजे गॅस एजन्सी तसेच श्री भादरिया इमिटेशन ज्वेलरी या दुकानांचा समावेश असल्याचे सांगण्यात आले आहे.

एकाच रात्री अनेक दुकाने फोडण्यात आल्याने व्यापाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मात्र आता रात्रीच्या वेळी गस्त वाढवण्याची आणि चोरीच्या घटनांना आळा घालण्याची मागणी व्यापारी वर्गातून पोलिसांना करण्याची शक्यता आहे.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये शस्त्रधारी चोरटे

घटनेची माहिती मिळताच शिक्रापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव यांच्यासह पोलीस पथकाने घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलीस हवालदार संदीप कारंडे, अमोल दांडगे, चंद्रकांत काळे आणि विश्वांबर वाघमारे यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांनी घटनास्थळाची माहिती घेतली.

दरम्यान, काही दुकानांच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हातात शस्त्रे घेऊन आलेले चोरटे दिसून आल्याची माहिती आहे. या फुटेजच्या आधारे तसेच इतर उपलब्ध पुराव्यांच्या मदतीने पोलिसांकडून चोरट्यांचा शोध सुरू आहे.

अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल

या प्रकरणी तानाजी खुशालराव पलांडे (वय ४७, रा. इनामवस्ती, मुखई, ता. शिरूर, जि. पुणे) यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल करण्यात आली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हवालदार हनुमंत गिरमकर करीत आहेत.

एकाच रात्री १३ दुकानांना लक्ष्य करणाऱ्या चोरट्यांनी परिसरातील व्यापाऱ्यांमध्ये भीती निर्माण केली आहे. या प्रकरणातील सर्व आरोपींचा शोध घेऊन चोरीच्या घटनांचा छडा लावण्याचे आव्हान आता शिक्रापूर पोलिसांसमोर आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts