Vijayawada EV Car Accident : कारचा वेग तब्बल ताशी 150 किमी…गाडीत 5 जण…कौटुंबिक कार्यक्रम आवरून घरी परतत होते…गाडीत आनंदाचे वातावरण होते…लवकरच घरी पोहोचण्याची घाई देखील होती…यामुळे कारने वेग पकडला…या गाडीत एक 3 ते 4 वर्षांचा चिमुकला देखील होता…सर्वांना वाटले की लवकर घरी पोहोचू…ही भरधाव कार दुसऱ्या कारला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्न करत असताना अचानक चालकाचा कारवरील नियंत्रण सुटला…कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या डिव्हायडरला धडकली…
त्यातच कार ईव्ही होती…त्यामुळे कार डिव्हायरला धडकताच कारमधील बॅटरीचा जोरदार स्फोट झाला आणि काही सेकंदातच कारने पेट घेतला…कार काही सेकंदातच आग ओकणारा गोळा झाली…यावेळी कारमध्ये पाच जण होते…चिमुकला ज्याने अद्याप नीट जग, दुनिया देखील पाहिली नव्हती…पाहूयात की पुढं काय झालं? आग लागल्यानंतर कारमधील चारही जण जिवंत कसे जळाले? ईव्ही कारच्या ऐवजी जर डिझेलची कार राहिली असती तर कारला आग लागली असती का? कारमधील लोक जिवंत वाचले असते का?
विजयवाडा वेस्ट बायपासवर नेमकं काय घडलं? ( Vijayawada EV Car Accident )
आज मरण खूपच स्वस्त झाल्याचे दिसून येत आहे…चालता चालता माणसाचा मृत्यू होत असल्याचे दिसून येत आहे…असाच प्रकार आंध्र प्रदेशमधील विजयवाडा वेस्ट बायपासवर घडला आहे…5 जण एका कौटुंबिक कार्यक्रमातून घरी परतत असतात…संध्याकाळचा वेळ होता आणि कार अचानक धडकते…अपघात होताच कार पेट घेते…या आगीत 39 वर्षीय कोंमारेड्डी रामदेव, त्यांची आई अरुणा, बहीण तिगुरू विजया (30 वर्षे) आणि रामदेव यांचा 3 वर्षांचा मुलगा आगीत जिवंत जळालेल…तर कारमध्ये प्रवास करणारी आणखी एक महिला जिचं नाव बी. विजया असून ती गंभीर भाजली असून, तिला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे… तिची प्रकृती सध्या अत्यंत चिंताजनक आहे…
स्थानिक पोलीस ठाण्यातून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, मृत कोंमारेड्डी रामदेव हे विजयवाडा जवळील नुन्ना गावचे रहिवासी असून ते व्यावसायिक होते… ते आपल्या कुटुंबासह गुंटूर जिल्ह्यातील नाम्बुरु गावात आयोजित एका कौतुंबिक कार्यक्रमासाठी गेले होते… कार्यक्रम आटोपून ते त्यांच्या नुकत्याच खरेदी केलेल्या नवीन एमजी विंडसर ईव्ही कारने ( MG Windsor EV Accident ) विजयवाडा येथील आपल्या घराकडे परतत होते… संध्याकाळी 6 च्या सुमारास त्यांची कार विजयवाडा वेस्ट बायपास रोडवरून जात असताना हा अपघात झाला… प्राथमिक तपासात समोर आलेल्या सीसीटीव्ही फुटेज आणि हायवे ट्रॅकिंगनुसार, कारचा वेग मर्यादेपेक्षा खूपच जास्त म्हणजेच ताशी सुमारे 150 किलोमीटर इतका प्रचंड होता…धडक इतकी भीषण होती की कार हवेत उडाली आणि रस्त्याशेजारील पॅरापेट वॉलवर जाऊन आदळली, ज्यामुळे कारचा समोरील हिस्सा पूर्णपणे चक्काचूर झाला…
हेही वाचा : हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढायचा आणि अश्लील व्हिडिओ साईट्स वर विकायचा: नेमकं प्रकरण काय?
अपघातानंतर कारला आग; एक महिला गंभीर जखमी ( MG Windsor EV Accident )
या भीषण दुर्घटनेनंतर एक बेजाबदार दृश्य पाहायला मिळाले… अपघात घडल्यानंतर रस्त्यावरून जाणाऱ्या प्रवाशांनी तात्काळ पोलीस आणि रुग्णवाहिकेला फोन करून माहिती दिली होती… पण हा अपघात ज्या सीमेवर झाला, तिथे दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीचा वाद उद्भवल्याची माहिती आहे…. घटनास्थळ कोणत्या पोलीस ठाण्याच्या कार्यकक्षेत येते या सीमारेषेच्या तांत्रिक मुद्द्यावरून पोलिसांमध्ये काही काळ वाद सुरू राहिला आणि या प्रशासकीय गोंधळामुळे आपत्कालीन यंत्रणेला घटनास्थळी पोहोचण्यास अत्यंत महत्त्वाचा वेळ लागला… स्थानिक नागरिकांनी कारच्या काचा फोडून आत अडकलेल्यांना काढण्याचा प्रयत्न केला… मात्र आगीची तीव्रता इतकी प्रचंड होती की कोणालाही कारच्या जवळ जाता येत नव्हते… जर पोलीस आणि अग्निशमन दल वेळेत पोहोचले असते, तर आग विझवून कदाचित काही जीव वाचवता आले असते, असा संताप प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केला आहे… काही वेळानंतर अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली.. मात्र तोपर्यंत केबिनमधील कोंमारेड्डी रामदेव, त्यांची आई कोंमारेड्डी अरुणा, त्यांची 30 वर्षीय बहीण तिगुरू विजया आणि रामदेव यांचा 3 वर्षांचा मुलगा यांचा होरपळून मृत्यू झाला होता…पोलिसांच्या बेजाबदार पणामुळे चार निष्पापांना जीव गमवावा लागला… कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या बी. विजया यांना स्थानिक नागरिकांनी खिडकीतून अत्यंत शिताफीने बाहेर काढले… त्या सुमारे 70 ते 80 टक्के गंभीर भाजल्या असून त्यांच्यावर विजयवाडा येथील जीजीएच रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत…
या ठिकाणी 3 वर्षांच्या चिमुकल्याचा देखील जिवंत जळून दुर्दैवी मृत्यू झालाय…बिचाऱ्या चिमुकल्याने अद्याप जिवन देखील निट जगले नव्हते…केवळ 3 वर्षांचा होता आणि त्याच्यासोबत देवाने प्रचंड वाईट केल्याची चर्चा होत आहे..त्याला एवढी भयंकर मृत्यू देवाने का दिली असेल…तो जळत असताना त्याचे कोवळे मन काय म्हणत असेल…इतर जण देखील जळताना त्यांचा जीव काय म्हटला असेल असंही म्हटलं जात आहे…जर ही कार ईव्ही ऐवजी डिझेलची असती तर चौघही जण वाचले असते का? असा प्रश्न आता निर्माण झालाय…तर तज्ज्ञांच्या मते, ताशी 150 किमी वेगाची धडक कोणत्याही वाहनासाठी तितकीच जीवघेणी ठरते….मात्र इंधनांच्या ज्वलन प्रक्रियेत एक मोठा फरक आहे… अपघात झाल्यानंतर डिझेल लगेच पेट घेत नाही…मोठा घर्षण झाला किंवा आगीची ठिणगी पडली तर कार पेट घेते…त्यातही डिझेल कारला आग लागल्यास ती हळूहळू पसरते…ज्यामुळे प्रवाशांना बाहेर काढण्यासाठी काही मिनिटांचा अवधी मिळू शकला असता… याउलट, ईव्ही कारमधील लिथियम बॅटरीचा स्फोट हा रासायनिक असल्याने तो सेकंदाच्या भागात होतो आणि तापमान थेट 1200 अंश सेल्सिअसच्या पार जाते… ज्यामुळे बचावाची संधी खूप कमी मिळते…म्हणजे वेळच मिळत नाही.. तसंच, पारंपरिक इंजिन कारमध्ये सेंट्रल लॉक निकामी झाले, तरी मेकॅनिकल लिव्हर ओढून मॅन्युअली दरवाजा उघडता येतो…जो पर्याय ईव्हीच्या पूर्ण इलेक्ट्रॉनिक सिस्टीममध्ये ब्लॉक झाला होता…
इलेक्ट्रिक आणि डिझेल कारच्या आगीमध्ये काय फरक असतो? ( Electric Car Fire Accident )
हा अपघात घडल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांनी अपघाताची दखल घेतली आहे…तर विजयवाडा वेस्ट झोनचे पोलीस उपायुक्तांनी सांगितले की, नुन्ना पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून महामार्गाचे सीसीटीव्ही फुटेज फॉरेन्सिक लॅबकडे पाठवण्यात आले आहे… कार उत्पादक कंपनीच्या तांत्रिक पथकालाही पाचारण करण्यात आले असून अपघातावेळी बॅटरी मॅनेजमेंट सिस्टीम, एअरबॅग्ज आणि ऑटो-कट ऑफ या सुरक्षेच्या यंत्रणांनी योग्य काम केले होते की नाही, याचा अधिकृत तांत्रिक अहवाल लवकरच प्राप्त केला जाईल…या अपघातात जो प्रकार घडलाय तो कुणासोबतही घडू नये, असं आता म्हटलं जात आहे…





