• Home
  • ताज्या बातम्या
  • राहुल गांधींचा मोदींना ‘मोगॅम्बो’ टोला; गांधी आणि थलपती विजय यांची भेट; चेन्नईतील चर्चेचा राजकीय अर्थ काय?
राजकारण

राहुल गांधींचा मोदींना ‘मोगॅम्बो’ टोला; गांधी आणि थलपती विजय यांची भेट; चेन्नईतील चर्चेचा राजकीय अर्थ काय?

Rahul Gandhi Mogambo

Rahul Gandhi Mogambo : राजकारणाचा पारा सध्या असा काही चढलाय की दिल्लीपासून गल्लीपर्यंत आणि थेट चेन्नईच्या समुद्रकिनाऱ्यापर्यंत फक्त एकाच नावाचा ट्रेंड आहे. निमित्त ठरलंय काँग्रेस नेते राहुल गांधी यांचं चेन्नईतलं ते वादळी भाषण. त्यांनी थेट देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना ‘मिस्टर इंडिया’ सिनेमातल्या त्या खतरनाक, क्रूर आणि हुकूमशहा विलनशी म्हणजेच ‘मोगॅम्बो’शी केलीये…. काल छात्रो कि गुंज या कार्यक्रमात राहुल गांधींनी मोदींवर जहरी टीका केली, कार्यक्रमाच्या आधी मुख्यमंत्री विजय थलपती आणि राहुल गांधींची भेट झाली, दोघांमध्ये एक तास चर्चा झाली, राहुल गांधी आणि थलापती विजय यांच्या ‘कॅफे डिप्लोमसी’चा अर्थ काय? आणि या सगळ्यावरून भाजप बॅकफूटवर आलीये का?

राहुल गांधींचा मोदींना ‘मोगॅम्बो’ टोला ( Rahul Gandhi Mogambo )

चेन्नईत छात्रों की गूंज कार्यक्रम झाला, हजारो तरुण तरुणींनी तिथे गर्दी केली होती. राहुल गांधींनी या कार्यक्रमात अनेक मुद्दे उपस्थित केले आणि मोदींवर जहरी टीका केली, राहुल गांधींनी नरेंद्र मोदींना ‘मोगॅम्बो मोदी’ म्हटलं आहे, तर ‘मोगॅम्बो जसा स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या अहंकारासाठी अख्खा देश उद्ध्वस्त करायला निघाला होता, तसंच काहीसं सध्या देशात सुरू आहे. असं राहुल गांधींनी म्हटलंय, राहुल गांधींचा आरोप आहे की, मोगॅम्बो मोदी आणि त्यांची गँग देशातल्या लोकशाहीचा आणि संविधानाचा गळा घोटतेय. धर्म, जात, आणि भाषेच्या नावावर लोकांना एकमेकांविरुद्ध लढवून हे सरकार देशात हुकूमशाही चालवतंय, असा घणाघाती आरोप त्यांनी केला.

राहुल गांधी यांनी सरकारला तीन प्रमुख मुद्द्यांवरून घेरलं, दिल्लीत इंटरनेट बंद करून विद्यार्थ्यांचा आवाज कसा दाबला गेला, हे सांगत त्यांनी केंद्र सरकारला ‘हुकूमशहा’ म्हटलं. तर तामिळनाडूच्या भूमीवर उभे राहून राहुल गांधींनी प्रादेशिक कार्ड खेळलं. अमित शाह आणि मोदी हे तामिळ संस्कृती, तिचा इतिहास आणि तिथली भाषा नष्ट करायचा प्रयत्न करत आहेत, असा थेट आरोप त्यांनी केला. सर्वात मोठा टोला हा होता की, राहुल गांधी म्हणाले, ‘मोदीजी, Game is over. हे सरकार तुमच्या स्वतःच्या हिमतीवर आलेलं नाही, तर हे मित्रपक्षांच्या कुबड्यांवर टिकून असलेलं एक कमकुवत सरकार आहे.’

हेही वाचा : एक आंदोलन, अनेक प्रश्न… राहुल गांधींच्या रणनीतीने दिल्लीतील राजकारण तापलं; पुढचा डाव कोणता?

राहुल गांधी आणि थलपती विजय यांची भेट चर्चेत ( Rahul Gandhi Vijay Meeting )

भाषणाच्या आधी, राहुल गांधी यांनी तामिळनाडूचे नवे मुख्यमंत्री आणि साऊथचे सुपरस्टार ‘थलापती‘ जोसेफ विजय यांच्या नीलंकरई येथील निवासस्थानी त्यांची भेट घेतली, दोन्ही नेत्यांमध्ये तासभर राजकीय चर्चा झाली. राहुल गांधी आणि थलपती विजय हि जोडी तरुणांच्या मनावर प्रचंड भुरळ घालत असते, आणि हे दोघे नेते एकत्र भेटल्यामुळे दाक्षिणात्य राजकारण विजय थलपतींच्या मुळे राहुल गांधींच्या बाजूने झुकायला सुरुवात झालीये,

एकूणच काय तर तामिळनाडूच्या भूमीवरून राहुल गांधींनी आगामी राजकारणाची दिशा स्पष्ट केलीये. पण राजकारणाच्या या मैदानावर मोगॅम्बो खुश होणार की शेवटी ‘मिस्टर इंडिया’ बाजी मारणार, हे येणारा काळच ठरवेल….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts