Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • उन्हाळ्यात मुलांना ताप येतोय? मग दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या कारणे
Top News

उन्हाळ्यात मुलांना ताप येतोय? मग दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या कारणे

Common Symptoms of Summer Fever in Kids: उन्हाळ्यात मुलं वारंवार आजारी पडतात. अनेकदा साधा ताप आल्यावर पालक दुर्लक्ष करतात, पण यामुळे गंभीर आजारही होऊ शकतात. चला तर जाणून घेऊया या उन्हाळ्यात मुलांना ताप येण्याची मुखी करणे आणि त्यासाठी घरगुती सोपे उपाय कोणती करावीत.

उन्हाळा (summer) आला की अनेक मुलांना वारंवार ताप(Fever In Kids)  येण्याची समस्या जाणवते. यासोबतच त्यांना सतत कमजोरी, सुस्ती, घाम येणे, चिडचिड, भूक न लागणे आणि डोकेदुखी यांसारखी लक्षणे दिसू शकतात. काही मुलांना उलट्या किंवा जुलाब देखील होऊ शकते. विशेषतः ज्यांच्यात रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे. तसेच लहान नवजात बालक, शाळेत जाणारी मुले, आणि जास्त काळ बाहेर खेळणारी मुलं, यांना ही समस्या अधिक होत असते. अनेकदा पालक या आजारांना सामान्य आहेत म्हणून दुर्लक्ष करतात, पण जर वारंवार ताप येणे म्हणजे शरीरात काहीतरी गडबड होत आहे, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे.

हेही वाचा: ‘मिळाली का ST स्वर्गाची?’ आज ‘देऊळ बंद २’ने थिएटरमध्ये केली दमदार एन्ट्री; पहिल्याच दिवशी हाऊसफुलची चर्चा

ताप येण्यामागची मुख्य कारणे

संक्रमणाचा धोका वाढणे

उन्हाळ्यात तापमान जास्त असल्यामुळे बॅक्टेरिया आणि व्हायरस जलद वाढतात. मुलं बाहेर खेळताना धूळ, घाण आणि घामाच्या संपर्कात येतात, ज्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता वाढते.

शरीरात पाण्याची कमतरता

उन्हाळ्यात मुलांचा घाम जास्त येतो. पुरेसे पाणी न पिल्यास शरीरातील पाण्याची कमतरता होऊन ताप येऊ शकतो.

अस्वच्छता

हात नीट धुणे, स्वच्छता न ठेवणे किंवा गंदा पाणी प्यायल्यास पचनसंस्था आणि त्वचेसंबंधी संसर्ग होतो.

जंक फूड आणि असंतुलित आहार

जंक फूड, कमी पोषणयुक्त आहार आणि फळे-पाणी यांचा अभाव इम्युनिटी कमी करतो, ज्यामुळे मुलांना ताप येण्याची शक्यता वाढते.

उच्च उष्णता आणि धूप

थेट सूर्यप्रकाशात जास्त वेळ राहणेही शरीराला थकवते आणि ताप वाढवू शकते.

लक्षणे कोणती? (fever symptoms)

सतत बारीक ताप येणे
उलट्या, जुलाब किंवा पोट दुखणे.
थकवा, सुस्ती, भूक न लागणे
तीव्र डोकेदुखी, शरीरात वेदना होणे

घरगुती उपाय

दिवसभरात दर तासाला पाणी १ ग्लास पाणी प्यावे. ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहील.

मुलांना विशेषतः सकाळी किंवा संध्याकाळी बाहेर खेळण्यास पाठवा. जेणे करून सूर्यप्रकाशाचा त्रास होणार नाही.

खेळून झाल्यावर किंवा जेवताना हात स्वच्छ धुणे, घाम येताच नॅपकिन, टिशू पेपरने पुसणे आणि रोज घरात स्वच्छ वातावरण ठेवणे महत्वाचे आहे.

उन्हाळ्यात पाणी दार फळभाज्यांच्या सेवन करणे गरजेचे आहे. ताक, दही किंवा नारळ पाणी घ्यावे. जंक फूड कमी प्रमाणात खावे.

मुलांना पुरेशी झोप आणि विश्रांती देणे गरजेचे आहे, जेणेकरून शरीर लवकर बरा होईल.

मुलांना रोज झोपताना हळदीवाला दूध द्यावे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts