Raghuveer Khedkar: तमाशा हा महाराष्ट्रातील लोककलेतला एक अविभाज्य प्रकार आहे. याच महाराष्ट्रातील एका प्रसिद्ध तमासगीरला आज दिल्ली येथे देशातल्या सर्वोच नागरी पुरसस्कारांपैकी चौथा म्हणजेच पद्मश्री पुरस्कार देण्यात आला आहे. ज्येष्ठ तमासगीर रघुवीर खेडेकर याना राष्ट्रपती द्रौपदि मुर्मू यांच्याहस्ते पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. यामुळे संपूर्ण तमाशा कलावंतांसह राज्यभर आनंद व्यक्त केला जात आहे.
रघुवीर खेडकर हे तमाशा क्षेत्रातील एक ज्येष्ठ आणि मान्यवर कलाकार म्हणून ओळखले जातात. गेली चार दशकांहून अधिक काळ ते तमाशा रंगभूमीवर सातत्याने कार्यरत असून त्यांनी या लोककलेला नवे आयाम दिले आहेत. आई कातांबाई सातारकर यांनी सुरू केलेला तमाशा फड त्यांनी पुढे यशस्वीपणे सांभाळत परंपरा आणि प्रयोगशीलतेचा सुंदर संगम घडवला आहे. ते महाराष्ट्र राज्य ढोलकी फड तमाशा संघटनेचे अध्यक्ष असून फड मालक तसेच कलाकार म्हणूनही त्यांची वेगळी ओळख आहे. त्यांच्या या दीर्घ योगदानाची दखल घेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा जीवनसाधना गौरव पुरस्कार आणि पठ्ठे बापूराव पुरस्कार यांसारखे अनेक महत्त्वाचे सन्मान त्यांना यापूर्वी मिळाले आहेत. आपल्या आई व वडिलांचा तमाशाच्या वारसा त्यांनी पुढे चालवला आहे.
या गोष्टीमुळे सम्पूर्ण महाराष्ट्र भरातून त्यांचे कौतुक होत आहे. हा पुरस्कार सववेकरताना विशेष म्हणजे त्यांनी महाराष्ट्रीयन पेहराव धारण केला होता.










