Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • एसी-कूलरशिवाय घर थंड ठेवायचंय? ‘हे’ स्मार्ट उपाय नक्की ट्राय करा
ताज्या बातम्या

एसी-कूलरशिवाय घर थंड ठेवायचंय? ‘हे’ स्मार्ट उपाय नक्की ट्राय करा

Keep Your Home Cool In Summer | सध्या उन्हाळ्याचे (Summer) दिवस सुरू आहेत. तर या उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये बरेच लोक सतत घरात एसी, फॅन, कुलर लावून बसतात. पण काही लोक लाईट बिल वाचवण्यासाठी जास्त एसी, फॅनचा वापर करत नाहीत. त्यामुळे अशा लोकांना जास्त खर्च न करता आपले घर थंड आणि आरामदायक कसे ठेवावे, असा प्रश्न पडतो. तर तुम्हाला माहिती आहे का काही असे सोपे घरगुती उपाय आहेत जे आपले घर थंड ठेवण्यास प्रभावी ठरतात. तर तुम्हाला एसी किंवा कूलरशिवाय तुमचे घर थंड ठेवायचे असेल तर या उन्हाळ्यात आराम आणि सुखसोयी मिळवण्यासाठी काही स्मार्ट आणि सोपे उपाय जाणून घ्या.

हेही वाचा – केमिकल्सला करा रामराम; पांढरे केस काळे करायचेत? कढीपत्ता ठरेल नैसर्गिक उपाय

ओलसर पडदे वापरा: उन्हाळ्यात जर तुम्हाला तुमच्या घरी कुलर, एसी शिवाय गारवा हवा असेल तर खिडकीवर हलकी ओलसर चादर किंवा पडदा ठेवल्याने बाहेरील गरम हवा थंड होऊन आत येते. तसेच, या हंगामात हलक्या रंगाचे सुती किंवा लिननचे पडदे, चादरी आणि उशीचे कव्हर वापरा. ​​हलके रंग सूर्यप्रकाश परावर्तित करतात आणि डोळ्यांना सुखद वाटतात.

झाडे लावा: उन्हाळ्याचे दिवसांमध्ये तुमच्या घराचे उकाड्यापासून संरक्षण करण्यासाठी, तुमच्या बाल्कनीमध्ये भरपूर झाडे लावा. घरात किंवा बाल्कनीमध्ये झाडे ठेवल्याने तापमान कमी होण्यास आणि हवा ताजी राहण्यास मदत होते.

खिडक्या आणि दारांचा योग्य वापर : दिवसा सूर्यप्रकाश असताना खिडक्या आणि दारे बंद ठेवा. रात्री, तापमान कमी झाल्यावर, हवा खेळती राहण्यासाठी आणि थंड हवा आत येण्यासाठी ती उघडा.

मातीच्या भांड्यांचा वापर करा : उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी रेफ्रिजरेटरऐवजी मातीच्या भांड्यांचा वापर करा. मातीच्या भांड्यात साठवलेले पाणी केवळ थंडावाच देत नाही, तर खोलीत ठेवल्यावर सौम्य आर्द्रता देखील टिकवून ठेवते.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts