Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • लाईफस्टाईल
  • उन्हाळ्यात रिकाम्या पोटी बाहेर जाणं टाळा; नाहीतर ‘या’ समस्या उद्भवू शकतात
लाईफस्टाईल

उन्हाळ्यात रिकाम्या पोटी बाहेर जाणं टाळा; नाहीतर ‘या’ समस्या उद्भवू शकतात

Summer Health Tips: आजच्या धावपळीच्या जीवनशैलीत अनेकजण नाश्ता टाळतात, ज्याचा थेट परिणाम आरोग्यावर होतो. अशावेळी रिकाम्या पोटी उन्हात बाहेर पडणं शरीरासाठी हानिकारक ठरू शकतं आणि त्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

उन्हाळ्यात तीव्र सूर्यप्रकाश आणि वाढत्या उष्णतेचे शरीरावर मोठे परिणाम होतात. अशा वेळी, जर एखादी व्यक्ती उपाशीपोटी बाहेर पडली, तर शरीरातील ऊर्जेच्या कमतरतेमुळे उष्णता सहन करणे कठीण होऊ शकते. शरीराला योग्यरित्या कार्य करण्यासाठी आवश्यक असलेले ग्लुकोज आणि पोषक तत्वे मिळत नाहीत, ज्यामुळे अशक्तपणा येऊ शकतो.

हेही वाचा: आता WhatsApp वर चॅटिंगसाठी पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या एका क्लिकवर मेटाचा नवा प्लॅन

नेमका काय त्रास होऊ शकतो?

डॉक्टरांच्या मते, रिकाम्या पोटी उन्हात गेल्यास चक्कर येणे, अशक्तपणा आणि डोकेदुखी यांसारख्या समस्या दिसू शकतात. रक्तातील साखर कमी झाल्यामुळे अचानक थकवा जाणवू शकतो.

उष्णतेमुळे शरीरातील पाणी कमी होण्याचा (डिहायड्रेशन) धोका वाढतो. काही वेळ लक्ष केंद्रित करण्यात अडचण, चिडचिड किंवा घाबरल्यासारखे जाणवू शकते. जास्त वेळ अशी स्थिती राहिल्यास हीट स्ट्रोकचा धोका देखील वाढतो.

कोणती काळजी घ्यावी?

बाहेर जाण्यापूर्वी हलका आणि पौष्टिक नाश्ता करा.
बाहेर जाण्यापूर्वी पाण्याची बॉटल सोबत ठेवा.
दुपारच्या तीव्र उन्हात बाहेर जाणे टाळा
हलके आणि सैल कपडे घाला
शरीर हायड्रेटेड ठेवण्यासाठी पाणीदार फळांचे सेवन करा.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts