• Home
  • राशी भविष्य
  • संस्कृती
  • पूर्ण विधी आणि वैदिक मंत्रोच्चारानं केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; मंदिर परिसरात व्हिडिओ-रील्सवर बंदी
ताज्या बातम्या

पूर्ण विधी आणि वैदिक मंत्रोच्चारानं केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; मंदिर परिसरात व्हिडिओ-रील्सवर बंदी

पूर्ण विधी आणि वैदिक मंत्रोच्चारानं केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले; मंदिर परिसरात व्हिडिओ-रील्सवर बंदी

केदारनाथ kedarnath dham : आज श्री केदारनाथ धामचे दरवाजे भाविकांसाठी पूर्ण विधी आणि वैदिक मंत्रोच्चारासह उघडण्यात आले. याप्रसंगी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी हेदेखील उपस्थित होते. याप्रसंगी मंदिर 51 क्विंटल फुलांनी सजवण्यात आलं होतं. मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी दर्शनासाठी आलेल्या भाविकांचं स्वागत केलं. इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या एका पोस्टमध्ये मुख्यमंत्री धामी म्हणाले, “दरवाजे उघडण्याच्या या शुभप्रसंगी, उत्तराखंडच्या या पवित्र भूमीवरील पवित्र चार धाम यात्रेसाठी आम्ही तुम्हा सर्वांचं मनःपूर्वक स्वागत आणि अभिनंदन करतो.”

हेही वाचा : सोने-चांदीत जोरदार वाढ; चांदी ₹4500 ने उसळली, सोनंही महागलं, जाणून

स्वच्छता राखण्याचं आवाहन :

मंदिराला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री धामी म्हणाले की, “यात्रेला आजपासून सुरुवात होत असून भाविकांमध्ये प्रचंड उत्साह आहे. बद्री-केदार मंदिर समितीनं उत्कृष्ट व्यवस्था केली आहे. यात्रेकरुंच्या अनेक तुकड्या आधीच येथून निघून गेल्या आहेत. पवित्र विधींनुसार यात्रेला सुरुवात करताना भाविक साधारणपणे सर्व नियमांचं पालन करतात, परंतु एक विशेष नियम आहे ज्याचे पालन करण्याचे आवाहन आपल्या पंतप्रधानांनीही सर्वांना केलं आहे. म्हणजेच, स्वच्छता राखणं आणि तीर्थयात्रेचा मार्ग प्लास्टिकमुक्त ठेवणं. मला आशा आहे की हा संदेश या पवित्र स्थळावरून प्रतिध्वनित होईल आणि इतर सर्व ठिकाणी पसरेल.”

पंतप्रधान मोदींनी भाविकांना शुभेच्छा दिल्या :

पंतप्रधान मोदींनी त्यांच्या एक्स हँडलवरून पोस्ट केली, “आज, देवभूमी उत्तराखंडच्या पवित्र भूमीवर, श्री केदारनाथ धामचे दरवाजे सर्व भाविकांसाठी पूर्ण विधींसह उघडण्यात आले आहेत. केदारनाथ धाम आणि चारधामची ही यात्रा आपल्या श्रद्धा, एकता आणि समृद्ध परंपरांचा एक दिव्य उत्सव आहे. या यात्रा भारताच्या शाश्वत संस्कृतीची झलकही देतात. यावर्षी चारधाम यात्रेच्या प्रारंभाच्या निमित्तानं, मी उत्तराखंडला येणाऱ्या सर्व भाविकांना एका पत्राद्वारे माझ्या भावना व्यक्त केल्या आहेत. मी प्रार्थना करतो की बाबा केदार सर्वांवर आपला आशीर्वाद देवो आणि तुमची यात्रा शुभ करो. हर हर महादेव!

परिसरात रील बनवण्यावर बंदी :

यावर्षी जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मंदिराच्या परिसरात कोणत्याही प्रकारचं चित्रीकरण किंवा व्हिडिओग्राफी करण्यास मनाई आहे. मंदिराच्या आवारात मोबाईल फोनच्या वापरास देखील बंदी घालण्यात आली आहे. ही माहिती रुद्रप्रयागच्या पोलीस अधीक्षक, निहारिका तोमर यांनी दिली. निहारिका यांनी सांगितलं की, मंदिर प्रशासनानं मोबाईल काउंटर आणि लॉकर प्रणालीची देखील व्यवस्था केली आहे. मंदिराची प्रतिष्ठा आणि पवित्रता जपण्यासाठी, सर्व भाविकांनी मंदिराच्या आवारात कोणत्याही प्रकारची व्हिडिओग्राफी किंवा चित्रीकरण करु नये, असं आवाहन मी करु इच्छिते. तसंच परवानगीशिवाय ड्रोन उडवण्यासही बंदी असल्याचं पोलीस अधीक्षकांनी सांगितलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts