• Home
  • महाराष्ट्र
  • कोल्हापूर हादरलं! कर्जाच्या जाळ्यात अडकवून 3 वर्ष महिलेवर अत्याचार, धक्कादायक प्रकार उघडकीस
Top News

कोल्हापूर हादरलं! कर्जाच्या जाळ्यात अडकवून 3 वर्ष महिलेवर अत्याचार, धक्कादायक प्रकार उघडकीस

rape case 2 1

Kolhapur Women Rape Case | मागील काही दिवसापांसून राज्यात महिलांवर अत्याचार झाल्याच्या अनेक घटना घडताना दिसत आहेत. नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरातने आत्तापर्यंत अनेक महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. तर अमरावतीतील परतवाडा येथे एका तरूणाने 180 तरूणींचे लैंगिक शोषण करत त्यांचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केल्याची घटना घडली आहे. या घटनांनी संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. अशातच आता कोल्हापुरमध्ये आणखी एक अशीच धक्कादायक घटना घडली आहे.

कर्जफेडीपर्यंत महिलेवर 3 वर्ष अत्याचार

कोल्हापुरमध्ये एका महिलेवर तब्बल तीन वर्षे शारीरिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार घडला आहे. कर्जाच्या पैशांची परतफेड वेळेत न केल्याने या गोष्टीचा गैरफायदा घेत एका नराधम व्यक्तीने पीडित महिलेवर तब्बल तीन वर्षे शारीरिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी आरोपी विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

नेमकं घडलं काय?

मिळालेल्या माहितीनुसार, पीडित महिला ही एका सामाजिक संस्थेत आरोग्य सल्लागार म्हणून काम करते. तर आर्थिक अडचणींमुळे पीडितेने 2023 साली आरोपी अमित सानंतकडून 10 टक्के व्याजाने दोन लाख रूपये घेतले होते. त्यानंतर तिने काही थोडेफार पैसे आरोपीला परत केले, मात्र नंतर तिला आर्थिक अडचणी जाणवू लागल्या. याच गोष्टीचा गैरफायदा घेत आरोपीने पीडित महिलेकडे शरीरसंबंधाची मागणी केली. तसेच पीडित महिला घरी जेव्हा एकटी असायची तेव्हा आरोपी तिच्या घरी जाऊन तिच्यावर जबरदस्ती करून अत्याचार करत त्याने काही व्हिडीओ देखील रेकॉर्ड केले होते.

व्हिडीओ दाखवत आरोपी पीडित महिलेला ब्लॅकमेल करत होता आणि तिला हॉटेलमध्ये बोलावून, कारमध्ये बोलावून तिच्यावर अत्याचार करत होता. मागील तीन वर्षे हा अत्याचार सुरूच होता. नंतर पीडितेने नोव्हेंबर 2025 पर्यंत आरोपीला व्याजासह दोन लाख दहा हजार रूपये परत केले. मात्र 25 हजरांसाठी आरोपी व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत होता. त्यानंतर या सर्व त्रासाला कंटाळून पीडित महिलेने धैर्याने पोलीस स्थानकात जात आरोपी विरोधात तक्रार दाखल केली आहे.

पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. तर आरोपी हा चालक म्हणून काम करत असल्याचं समोर आलं आहे. तसेच त्याने महिलेच्या एकटेपणाचा गैरफायदा घेत तिच्यावर अत्याचार केला. आता पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा अधिक तपास केला जात आहे. तसेच आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts