• Home
  • महाराष्ट्र
  • जळगाव हादरलं! 65 वर्षीय वृद्धाने चिमुकलीसोबत केले अश्लील चाळे, गावकऱ्यांनी संतप्त होत केली घराची तोडफोड
Top News

जळगाव हादरलं! 65 वर्षीय वृद्धाने चिमुकलीसोबत केले अश्लील चाळे, गावकऱ्यांनी संतप्त होत केली घराची तोडफोड

rape case 7

Jalgaon Crime | मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रात अनेक अत्याचाराच्या घटना घडताना दिसत आहेत. गेल्या काही दिवसांपूर्वीच पुण्यातील (Pune) नसरापूर (Nasrapur) तालुक्यात तीन वर्षांच्या चिमुकलीवर एका नराधमाने बलात्कार करत तिची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली होती. या घटनेनं संपूर्ण राज्य हादरलं होतं. ही घटना ताजी असतानाच आता जळगावमध्ये (Jalgaon) एक संतापजनक घटना घडली आहे.

हेही वाचा – वाल्मिक कराडला तुरूंगातच झाला मोठा संसर्ग; अचानक बिघडली प्रकृती, नेमकं झालं तरी काय?

जळगावमध्ये नेमकं घडलं काय?

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव तालुक्यातील एका गावामध्ये तीन वर्षांच्या चिमुकलीसोबत 65 वर्षीय वृद्धाने अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शांताराम चैत्राम परदेशी (वय 65) असं आरोपीचं नाव आहे. तर या घटनेनंतर संतप्त गावकऱ्यांनी आरोपीच्या घराची तोडफोड केली आहे.

समोर आलेल्या माहितीनुसार, तीन वर्षांची मुलगी खेळत असताना तिचा गैरफायदा घेत आरोपीनं तिच्यासोबत अश्लील चाळे करत तिचा विनयभंग केला. त्यानंतर हा प्रकार संपूर्ण गावात पसरला. तर या घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी संतप्त होत आरोपी शांताराम परदेशीच्या घराची तोडफोड केली. यामुळे गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या प्रकरणी पीडितेच्या आईने चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानतात आरोपीविरोधात तक्रार दाखल केली. तर पोलिसांनी विनयभंग आणि पोक्सो कायद्याच्या अंतर्गत विविध कलमांनुसार आरोपीवर गुन्हा दाखल केला असून त्याला अटक केली आहे. सध्या पोलीस या प्रकरणाचा अधित तपास करत असून आरोपीची कसून चौकशी केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts