Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानात ठार; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या
Top News

पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार पाकिस्तानात ठार; अज्ञात हल्लेखोरांनी झाडल्या गोळ्या

Pulwama attack mastermind Hamza Burhan Killed | पुलवामा हल्ल्याचा सूत्रधार अर्जमंद गुलजार उर्फ ​​बुरहान हमजा (Burhan Hamza) ठार झाला आसल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानमध्ये (Pakistan) काही अज्ञात हल्लोखोरांनी गोळीबार करत बुरहान हमजाचा खात्मा केला आहे. अर्जमंद गुलजार हा पाकिस्तानचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी होता. तर आता त्याच्या मृत्युमुळे दहशतवादी नेटवर्कला मोठा धक्का बसला आहे.

हेही वाचा – सुवेंदू अधिकारी पीए हत्या प्रकरणी पोलिसांनी चुकीच्या व्यक्तीला केलेली अटक, CBIच्या हाती लागला खरा आरोपी

पाकिस्तानमध्ये दहशतवादी बुरहान हमजा ठार

पाकिस्तानमधील मुझफ्फराबादमध्ये काही अज्ञात हल्लोखोरांनी अर्जमंद गुलजारवर गोळ्या झाडत त्याची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे मुझफ्फराबादमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

सुरक्षा यंत्रणांच्या मते अर्जमंद गुलजार हा बऱ्याच काळापासून भारतविरोधी दहशतवादी कारवायांमध्ये सामील होता. अर्जमंद गुलजार मूळचा जम्मू आणि काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यातील रत्नीपोरा भागातील होता. तसेच त्याची दक्षिण काश्मीरमधील तरुणांना कट्टरपंथी बनवण्यात प्रमुख भूमिका होती. मिळालेल्या माहितीनुसार, 7 वर्षांपूर्वी तो वैध कागदपत्रांचा वापर करून पाकिस्तानला गेला होता जिथे तो अल-बद्र या दहशतवादी संघटनेत सामील झाला होता. नंतर तो संघटनेचा ऑपरेशनल कमांडर बनला आणि पाकिस्तानमधून त्याने काश्मीरमध्ये दहशतवादी भरती, निधीपुरवठा आणि शस्त्रपुरवठ्याचे जाळे चालवायला सुरुवात केली होती.

अर्जमंद गुलजारला भारतीय सुरक्षा यंत्रणांन बऱ्याच काळापासून त्यांच्या ‘मोस्ट वॉन्टेड’ यादीत ठेवले होते. तर 2022 मध्ये भारतीय गृह मंत्रालयाने त्याला अधिकृतपणे दहशतवादी म्हणून घोषित केले होते. मंत्रालयाच्या मते, पुलवामा आणि दक्षिण काश्मीरमध्ये दहशत पसरवण्यात, तरुणांना दहशतवादी संघटनांमध्ये भरती करण्यात आणि दहशतवादासाठी निधी उभारण्यात तो सक्रियपणे सहभागी होता.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts