Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • महाराष्ट्र
  • बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानची मोठी कारवाई; 35 दहशतवाद्यांचा केला खात्मा
Top News

बलुचिस्तानमध्ये पाकिस्तानची मोठी कारवाई; 35 दहशतवाद्यांचा केला खात्मा

Pakistan Attacks On Baluchistan | नुकतीच पाकिस्तानने (Pakistan) मोठी कारवाई केली आहे. पाकिस्तानी सुरक्षा दलांनी बलुचिस्तानमध्ये (Baluchistan) मोठा हल्ला केला. त्यांनी बलुचिस्तानमधील मंगला जरघून घर परिसरात एक मोठी कारवाई करत 35 दहशतवाद्यांना ठार केले असल्याचा दावा पाकिस्तानने केला आहे. तसेच तीन वरिष्ठ कमांडरांना अटक देखील केली आहे.

हेही वाचा – प्रसिद्ध कंटेंट क्रिएटरने वयाच्या 30 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; सोशल मीडियावर खळबळ, मृत्यूचं कारण चर्चेत

पाकिस्तानचा बलुचिस्तानवर मोठा हल्ला, 35 दहशतवादी ठार

13 मे रोजी सुरू केलेल्या मोहिमेअंतर्गत पाकिस्तानने बलुचिस्तानवर मोठी कारवाई केली. या कारवाईत चार दिवसांमध्ये 35 दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानच्या या कारवाईने बलुचिस्तान चांगलेच हादरले आहे.

या कारवाईबाबत बलुचिस्तान सरकारचे प्रवक्ते शाहिद रिंद यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, ही कारवाई बलुचिस्तानमधील बंदी घातलेल्या तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि त्याच्या संलग्न गटांविरुद्ध करण्यात आली आहे. या कारवाईमध्ये पकडलेले तिन्ही कमांडर हे उच्चपदस्थ व्यक्ती आहेत आणि प्रांतात यापूर्वी पकडलेल्या दहशतवाद्यांकडून मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली आहे.

पुढे त्यांनी सांगितले की, सुरक्षा दलांच्या कारवाईदरम्यान मंगला जरघून घर भागातील अनेक तळ उद्ध्वस्त करण्यात आले आहेत. प्रांतातून मिळालेल्या माहितीच्या आधारे ही कारवाई केली जात असून, दहशतवाद संपवण्याचे या कारवाईचे मुख्य उद्दिष्ट आहे, असं शाहिद रिंद यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गेल्या बुधवारी बलुचिस्तानच्या बरखान जिल्ह्यात दहशतवाद्यांविरुद्धच्या कारवाईत एका मेजरसह पाच जवान शहीद झाल्यानंतर बदला घेण्यासाठी पाकिस्तानने ही कारवाई केली आहे. या कारवाईत किमान सात दहशतवादी ठार झाले असल्याची माहिती समोर आली आहे.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts