• Home
  • देश
  • पाकिस्तान हादरला! गॅस पाइपालाइनचा भीषण स्फोट, 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू
Top News

पाकिस्तान हादरला! गॅस पाइपालाइनचा भीषण स्फोट, 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू

gas pipeline

Gas Pipeline Explosion In Pakistan | पाकिस्तानला (Pakistan) मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानमध्ये एका गॅस पाइपलाइनचा भीषण स्फोट (Gas Pipeline Explosion) झाला आहे. या स्फोटात 8 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून अनेकजण जखमी झाले आहेत. यामध्ये पाकिस्तानचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाकिस्तानच्या खैबर पख्तुनख्वा प्रांतातील हरिपूर जिल्ह्यातील एका औद्योगिक परिसरात हा स्फोट झाला आहे.

हेही वाचा – डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक, म्हणाले, “ते माझे मित्र असून, त्यांच्यासोबत…”

पाकिस्तानमध्ये गॅस पाइपालाइनचा भीषण स्फोट

आज सकाळी हरिपूर जिल्ह्यातील एका औद्योगिक परिसरात गॅस पाइपलाइनचा मोठा स्फोट झाला. या स्फोटात आठ जणांचा मृत्यू झाला आहे. ही भीषण घटना हरिपूर जिल्ह्यातील हत्तार औद्योगिक वसाहतीमधील ग्रँड ट्रंक रोडजवळील एका कारखान्याजवळ घडली.

मिळालेल्या माहितीनुसार, गॅस पाइपलाइनचा स्फोट इतका शक्तिशाली होता की त्यामुळे तात्काळ मोठी आग लागली होती. ही आग आजूबाजूच्या परिसरात वेगाने पसरली होती. त्यामुळे तेथील जवळची काही घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यामुळे या स्फोटात मोठे नुकसान झाले आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी तातडीनं दाखल झाले असून बचावकार्य सुरू आहे.

पाकिस्तानच्या आपत्कालीन सेवा अधिकाऱ्यांनी सांगितले की, या अपघातात आठ जणांचा मृत्यू असून इतर अनेक जण गंभीररित्या भाजले आहेत. तसेच या घटनेबाबत हरिपूर जिल्हा पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, या घटनेदरम्यान आग वेगाने पसरत असताना किमान चार महिला आणि सहा मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच काही महिला आणि मुले गंभीररित्या भाजली असून बचावकार्य अजूनही सुरू आहे. घटनास्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच गॅस पाइपलाइन स्फोटाचे कारण अद्याप कळलेले नाही.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts