• Home
  • देश
  • डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक, म्हणाले, “ते माझे मित्र असून त्यांच्यासोबत…”
Top News

डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं पंतप्रधान मोदींचं कौतुक, म्हणाले, “ते माझे मित्र असून त्यांच्यासोबत…”

punjab 1

Donald Trump On PM Modi | काही दिवसांपूर्वीच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यासोबत फोनवर संवाद साधला होता. त्यानेळी संभाषणाच्या शेवटी डोनाल्ड ट्रम्प पंतप्रधान मोदींना म्हणाले होते की, “आम्हा सर्वांचे तुमच्यावर खूप प्रेम आहे.” तसेच आताही डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये पुन्हा एकदा पंतप्रधान मोदींचं कौतुक करत त्यांना आपला खरा मित्र म्हटलं आहे.

हेही वाचा – पंजाब पेटला! शेतकऱ्यांचे रेल्वे रोको आंदोलन, वाहतुकीवर मोठा परिणाम, आंदोलनामागे कारण काय?

पंतप्रधान मोदींबाबत काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?

नुकतंच डोनाल्ड ट्रम्प यांना प्रसार माध्यमांनी पंतप्रधान मोदींसोबतच्या त्यांच्या अलीकडील संभाषणाबद्दल विचारले. त्यावर उत्तर देताना ट्रम्प म्हणाले की, “माझे मित्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत माझे खूप चांगले संभाषण झाले आहे. ते माझे भारतातील एक चांगले मित्र आहेत. तसेच ते खूप चांगले काम करत आहेत. आमचे खूप चांगले संभाषण झाले”, अशी माहिती ट्रम्प यांनी दिली.

गेल्या मंगळवारी (7 एप्रिल) डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदींना फोन करून द्विपक्षीय संबंधांवर चर्चा केली होती आणि पश्चिम आशियातील परिस्थितीवर विचारांची देवाणघेवाण केली होती. अमेरिका आणि इस्रायलने इराणविरुद्ध युद्ध सुरू केल्यानंतर पंतप्रधान मोदींसोबतचा हा डोनाल्ड ट्रम्प यांचा पहिला संवाद होता.

7 एप्रिल रोजी डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका आणि इराण यांच्यात दोन आठवड्यांच्या युद्धविरामाची घोषणा केली होती. मात्र, इस्लामाबादमधील पहिली शांतता चर्चा अनिर्णित राहिल्याने आता पुन्हा एकदा दोन्ही देश शांतता चर्चेची दुसरी फेरी करण्याचा प्रयत्न करत आहेत.

दरम्यान, अमेरिकेची मागणी आहे की तेहरानने अण्वस्त्रे आणि युरेनियम संवर्धनाचा पाठपुरावा सोडून द्यावा. मात्र, इराण आपल्या भूमिकेवर ठाम आहे. तसेच आता डोनाल्ड ट्रम्प यांनी दावा केला आहे की इराणने युरेनियम संवर्धन थांबवण्यास सहमती दर्शवली आहे. पण ट्रम्प यांच्या या दाव्यावर इराणने अद्याप अधिकृतपणे दुजोरा दिलेला नाहीये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts