Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • वर्ल्ड
  • इराण-अमेरिका शांतता चर्चेसाठी पाकिस्तानचे प्रयत्न; तेहराननंतर थेट अमेरिकेच्या दिशेने हालचाल
Top News

इराण-अमेरिका शांतता चर्चेसाठी पाकिस्तानचे प्रयत्न; तेहराननंतर थेट अमेरिकेच्या दिशेने हालचाल

US-Iran War | सध्या इराण (Iran) आणि अमेरिका (US) या देशांमध्ये पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले. त्यामुळे आता या दोन्ही देशांमधील युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानने (Pakistan) पुन्हा एकदा प्रयत्न करण्यास सुरूवात केली आहे. पाकिस्तानने, इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चेची दुसरी फेरी घडवून आणण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. तणावाच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानने दोन्ही देशांमध्ये मध्यस्थी केली आहे. तर पाकिस्तानच्या या मध्यस्थीवर संपूर्ण जगाची नजर लागून राहिली आहे.

हेही वाचा – TCS कंपनीतील आरोपींचे दिल्ली स्फोट प्रकरणातील दहशतवाद्यांसोबत कनेक्शन? नवे धागेदोरे समोर

इराण-अमेरिका शांतता चर्चेसाठी पाकिस्तानचे प्रयत्न सुरू

पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर सध्या तेहरानमध्ये असून आज (16 एप्रिल) ते इराणी अधिकाऱ्यांची भेट घेत आहेत. तर या भेटीनंतर मुनीर थेट अमेरिकेला जाण्याच्या तयारीत आहेत. अल जझीरा मीडियाने दावा केला आहे की, तेहराननंतर मुनीर थेट वॉशिंग्टनला जाणार आहेत.

इराण आणि अमेरिका यांच्यातील पहिली शांतता चर्चा 11 एप्रिल रोजी इस्लामाबादमध्ये झाली होती. मात्र, या चर्चेत मध्यस्थी करताना पाकिस्तानला यश आले नाही. 21 तासांच्या चर्चेनंतरही बैठकीतून कोणताही निष्पन्न न झाल्याने, अमेरिकेचे उपराष्ट्रपती जेडी व्हान्स आणि इराणी शिष्टमंडळ एकमेकांना आव्हान देत ते आपापल्या देशांत परतले होते.

पाकिस्तान सध्या अमेरिका आणि इराण यांच्यातील सुरू असलेल्या राजनैतिक संघर्षात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करत आहे. मुनीर बुधवारपासून तेहरानच्या दौऱ्यावर आहेत, जिथे ते शांतता चर्चेच्या दुसऱ्या फेरीत सहभागी होण्याच्या करारावर पोहोचण्यासाठी इराणी अधिकाऱ्यांशी उच्चस्तरीय चर्चा करत आहेत. मुनीर यांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश अमेरिका-इराण चर्चेची दुसरी फेरी पुन्हा सुरू करणे हा आहे, जी गेल्या आठवड्यात इस्लामाबादमध्ये कोणत्याही ठोस परिणामांशिवाय संपली होती. तेहरानमध्ये, मुनीर यांनी इराणी परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. पाकिस्तानी लष्करी सूत्रांनुसार, हा दौरा दोन्ही देशांमधील दरी कमी करण्याच्या आणि शस्त्रसंधी अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नांचा एक भाग आहे.

इराण आणि अमेरिका यांच्यातील शांतता चर्चेला चालना देऊन पाकिस्तान आपली प्रतिमा सुधारू इच्छितो आहे, जेणेकरून इतर देश त्यांना कर्ज देऊ शकतील. जरी चर्चेची पहिली फेरी अयशस्वी ठरली असली तरी पाकिस्तानी पंतप्रधान शाहबाज शरीफ आणि लष्करप्रमुख आसिम मुनीर त्यांच्या उद्दिष्टात यशस्वी झाले आहेत. इस्लामाबादमधील चर्चेनंतर लगेचच पाकिस्तानला सौदी अरेबिया आणि कतारकडून 5 अब्ज डॉलर्सची मदत मिळाली. तर आता पाकिस्तान ओमानसारख्या देशांवरही लक्ष ठेवून आहे, जे त्यांना अतिरिक्त निधी देऊ शकतील. त्यामुळे आता पाकिस्तानी लष्करप्रमुख मुनीर उद्या वॉशिंग्टनला भेट देणार आहेत.

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts