• Home
  • Top News
  • आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वर्ध्याला दिली भेट; बापू कुटीची केली पाहणी
Top News

आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी वर्ध्याला दिली भेट; बापू कुटीची केली पाहणी

Droupadi Murmu

President Droupadi Murmu Visits Wardha on Official Tour: आज १६ एप्रिल २०२६ रोजी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूचा वर्ध्याला दौरा होता. यावेळी सेवाग्राम येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आश्रमास भेट दिली.

वर्धा | प्रतिनिधी

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सेवाग्राम येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या आश्रमास भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी प्रार्थना सभेत सहभाग घेतला तसेच परिसरात वृक्षारोपणही केले.

आश्रम परिसरात आगमन झाल्यानंतर आश्रम प्रतिष्ठानच्या वतीने सचिव विजय तांबे आणि विश्वस्त चंदनपाल यांनी राष्ट्रपतींचे स्वागत केले. यावेळी राज्यपाल जिष्णू देव वर्मा, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ. पंकज भोयर उपस्थित होते.

हेही वाचा: विधान परिषदेच्या १७ जागांसाठी लवकरच निवडणूक होणार; A टू Z माहिती जाणून घ्या

भेटीदरम्यान राष्ट्रपतींनी गांधीजींच्या ऐतिहासिक वास्तूंची पाहणी केली. त्यांनी ‘आदि निवास’, ‘बापू कुटी’, तसेच कस्तुरबा गांधी यांचे वास्तव्य असलेले ‘बा निवास’ आणि बापूंचे तत्कालीन कार्यालय येथे भेट देऊन माहिती जाणून घेतली. आश्रम प्रतिष्ठानचे सचिव विजय तांबे यांनी या वास्तूंचा ऐतिहासिक संदर्भ व गांधीजींच्या जीवनाशी संबंधित विविध बाबींची माहिती दिली.

यावेळी राष्ट्रपती मुर्मू यांनी चरख्यावर प्रत्यक्ष सूतकताई करून गांधीजींच्या स्वदेशी विचारांना अभिवादन केले. त्यानंतर त्यांनी बापू कुटी परिसरात बेल प्रजातीचे वृक्षारोपणही केले.

या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी वान्मथी सी, विशेष पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमण, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल तसेच आश्रम प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts