Gold and Silver Price Today : यूएस फेडरल रिझर्व्हच्या बैठकीच्या निकालापूर्वी आणि आंतरराष्ट्रीय बुलियन किमतींमध्ये वाढ झाल्यानंतर बुधवारी मल्टी कमोडिटी एक्सचेंज (एमसीएक्स) वर सोनं आणि चांदीच्या किमती वाढताना दिसत आहेत. बुधवारी एमसीएक्स वर सोनं जवळजवळ स्थिरपणे ₹1,19,647 प्रति 10 ग्रॅमवर उघडलं, जे कालच्या ₹1,19,646 च्या मागील बंदपेक्षा जास्त आहे. आज एमसीएक्स वर चांदी देखील किंचित वाढून ₹1,44,761 प्रति किलोवर उघडली, तर कालची किंमत ₹1,44,342 प्रति किलो होती.
सोनं आणि चांदीच्या भावात तेजी :
बुधवारी सकाळी एमसीएक्स वर सोन्याच्या किमती ₹401 (0.34%) नं वाढून ₹1,20,047 प्रति 10 ग्रॅमवर व्यवहार करत होत्या, तर चांदी ₹989 (0.69%) नं वाढून ₹1,45,331 प्रति किलोवर व्यवहार करत होती. जागतिक बाजारात, यूएस फेडरल रिझर्व्हनं अपेक्षित व्याजदर कपात करण्यापूर्वी सोन्याच्या किमती किंचित वाढल्या, जरी अमेरिका-चीन व्यापार तणाव कमी झाल्यामुळं सराफा बाजाराची ताकद कमी झाली.
मंगळवारीही वाढल्या किंमती : (Gold and Silver Price Today)
मंगळवार 7 ऑक्टोबरनंतरच्या नीचांकी पातळीवर पोहोचल्यानंतर स्पॉट गोल्डच्या किमती 0.2% वाढून 3,957.42 डॉलर प्रति औंस झाल्या. डिसेंबर डिलिव्हरीसाठी यूएस गोल्ड फ्युचर्स 0.3% घसरुन 3,971.20 डॉलर प्रति औंस झालं.
या वर्षी सोन्याच्या किमती 52% नं वाढल्या :
भू-राजकीय आणि आर्थिक अनिश्चितता, व्याजदर कपात आणि मध्यवर्ती बँकेच्या सततच्या खरेदीमुळं, या वर्षी आतापर्यंत सोन्याच्या किमती जवळजवळ 52% नं वाढल्या आहेत, 20 ऑक्टोबर रोजी 4,381.21 डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचल्या आहेत. तज्ञांच्या मते, डिसेंबरच्या समाप्तीसाठी एमसीएक्सवर सोन्याची किंमत 1,20,500 रुपये प्रति १० ग्रॅमपर्यंत वाढू शकते. दुसरीकडे, त्यांचा असा विश्वास आहे की 1,19,000 रुपयांची पातळी इंट्राडेसाठी आधार म्हणून काम करते.











