Gold silver price today India : जागतिक बाजारपेठेत मोठी उलथापालथ झाल्याचे बघायला मिळत आहे. जागतिक बाजारपेठेत विक्रमी उच्चांक गाठल्यानंतर उलथापालथ झाली. तर गुरुवारी मौल्यवान धातूंच्या बाजारपेठेत घसरण नोंदवण्यात आली आहे. तसेच सोने चांदीने देखील ऐतिहासिक उच्चांक गाठला होता. आता सोने आणि चांदीचे भाव धाडकन कमी झाले असून तुम्ही सोने चांदी खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे.
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चांदीची घसरण
भारतात 4 लाख 20 हजार रुपयांचा उच्चांक गाठल्यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत प्रति औंस 121 डॉलर पर्यंत पोहोचल्यानंतर चांदीने काही तासात मोठी घसरण अनुभवायला मिळाली. सोन्याचा दर प्रति औंस 500 डॉलरने घसरून 5100 डॉलरवर आला.
MCX नुसार आजचा सोन्याचा भाव
MCX च्या रिपोर्टनुसार सुरुवातीच्या व्यवहारात धातू 5 टक्क्यांवरून जास्त घसरल्याचे बघायला मिळाले. 30 जानेवारी म्हणजे आज सकाळी MCX वर सोन्याचा भाव 5.55 टक्क्यांनी घसरून 1 लाख 60 हजार 1 रुपये प्रति 10 ग्राम एवढा झाला असून लक्षणीय घट झाल्याचे बघायला मिळाले. यापूर्वी सोने 1 लाख 93 हजार 96 रुपये उचांकावर पोहोचले होते. परंतु आज सोन्याचे भाव अंदाजे 9 हजार 402 रुपयांनी घसरल्याचे निदर्शनास आले.
हे ही वाचा : यंदाच्या अर्थसंकल्पात तरुणांना गोड बातमी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या कसं असेल यंदाचे बजेट
काय आहे आजचा चांदीचा भाव
चांदीचे भाव आज 4.18 टक्क्यांनी घसरले असून 1 किलोसाठी चांदीची किंमत आता 3 लाख 83 हजार 177 रुपये एवढी झाली आहे. ही घसरण एकाच दिवसात 16 हजार 716 रुपयांनी घटले. गुरुवारी हा आकडा 4 लाख 20 हजार 48 रुपये प्रतिकिलोवर पोहोचला होता. परंतु आज हा दार कमी झाल्याने सोने चांदी खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे.
किरकोळ बाजारपेठेत देखील मंदी
आज फ्युचर्स मार्केटसह किरकोळ बाजारपेठेत देखील मंदी बघायला मिळाली. त्यामुळे छोट्या खरेदीदारांसाठी देखील सोने खरेदीची आज चांगली संधी आहे. त्यानुसार आज किरकोळ बाजारपेठेत सोन्याचा भाव 5300 रुपयांनी घसरून 1 लाख 65 हजार 180 प्रति 10 ग्रॅमवर पोहोचला आहे. याशिवाय चांदीच्या भावात 23 हजार 360 रुपयांची घसरण होऊन चांदीची आत्ताची किंमत 3 लाख 79 हजार 130 रुपये प्रति किलोवर पोहोचली आहे.












