Breaking News :
  • Home
  • राजकारण
  • उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीचे CID ला दिले आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तपास
Top News

उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या विमान अपघाताच्या चौकशीचे CID ला दिले आदेश; एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तपास

Ajit Pawar plane crash CID inquiry

Ajit Pawar plane crash CID inquiry : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी निधन झाले. गुरुवारी अत्यंत शोकाकुल वातावरणात शासकीय इतमामात अखेरचा निरोप देण्यात आला. त्यांचे अंतिम दर्शन घेण्यासाठी अगणित लोकांनी हजेरी लावली. त्यांच्या जाण्याने संपूर्ण राज्यावर शोककळा पसरली होती. मुंबईहून बारामती जात असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचाच अपघात झाला. या अपघातात त्यांचे निधन झाले. आता या विमान दुर्घटनेच्या तपासाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.

CID ला दिले चौकशीचे आदेश

राज्य सरकारकडून सीआयडी चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. यापूर्वी फॉरेन्सिक टीमने यापूर्वीच अपघातस्थळी जाऊन नमुने जमा केले होते. आता सीआयडी चौकशी होणार असून एक्सिडेंटल डेथ रिपोर्टच्या अनुषंगाने तपास करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

हे ही वाचा : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर राज्याचा अर्थसंकल्प कोण मांडणार ?

प्राथमिक अहवाल

या विमान अपघातामध्ये सरकारी अहवालानुसार, सकाळी 8 वाजून 18 मिनिटांनी हे विमान बारामतीत आलं. त्यावेळी वैमानिकाला सध्या वारा फार नसून दृश्यमानता साधारणतः 3000 मीटर एवढी आहे. त्यानंतर विमानातील पायलटने असं सांगितलं कि, ते रनवे क्रमांक 11 च्या दिशेने येत आहेत. परंतु त्यांना रनवे दिसत नाही. त्यानंतर रनवे दिसत असल्याची माहिती पायलटने परत ATC ला दिली. 8 वाजून 43 मिनिटांनी लँडिंग करण्यासाठी तयार झाले. त्यानंतर संपर्क तुटला आणि पायलटकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर सर्वत्र काही क्षणात धावपट्टीच्या डाव्या बाजूला ज्वाळा आणि धुराचे लोट बघायला मिळाले.

असा होता घटनाक्रम

बारामती परिसरात दाट धुके दृश्यमानता अत्यंत कमी होती. ज्या ठिकाणी विमान लँड करणार होते त्याठिकाणी विमानतळ फार लहान होते. तिथे ILS म्हणजे इंस्ट्युमेन्ट लँडिंग सिस्टीम सुविधा उपलब्ध नाही. त्यामुळे पायलटला मॅन्युअल लँडिंग करावी लागली. तसेच विमान पायलटला रनवे दिसत नसल्याने मोठा वळसा घालावा लागला. म्हणजे पहिला लँडिंगचा प्रयत्न फसला. त्यानंतर धुक्यात लँडिंग करणे कठीण झाले. त्यानंतर रनवे दिसायला लागल्यानंतर दुसरा लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला. बारामती असलेले हे विमानतळ टेबल टॉप रनवे असल्याची माहिती DGCA च्या सूत्रानुसार मिळाली. आणि लॅण्डिंगवेळी हे विमान रानवेच्या कडेला कोसळले. सुमारे 100 फूट उंचीवरून विमानाचा तोल गेला. आणि रानवेपर्यंत पोहोचण्यापूर्वीच विमान जमिनीवर आदळले. आणि त्यानंतर मोठा स्फोट आणि नंतर छोटे स्फोट झाले. त्यानंतर स्फोटाचे रूपांतर भीषण आगीत झाले. आग लागल्याने तात्काळ बचावकार्य करता आले नाही. या अपघाताचा अजून तपास सुरु असून DGCA यांनी फायनल अहवाल सादर केल्यांनतर अपघाताचे कारण समोर येईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts