Shopping cart

लोकशिवाय – सत्याची नवी दिशा! | गोष्ट कुणाचीही असो, बाजू दोन्ही... दाखवत ते लोकशिवाय Stay informed with the latest updates, in-depth news analysis, and unbiased reports. At Lok Shevay, we are committed to bringing you the truth, free from sensationalism and distortion. We cover everything from current affairs and social issues to political developments and global happenings.

IST
  • Home
  • बिजनेस
  • सर्वसामान्यांचं टेन्शन वाढणार; सोने-चांदीचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या आजचे दर
Top News

सर्वसामान्यांचं टेन्शन वाढणार; सोने-चांदीचे दर पुन्हा वाढले, जाणून घ्या आजचे दर

Gold-Silver Prices | अमेरिका (US) आणि इराण (Iran) यांच्यातील तणाव आता कमी होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यामुळे अनेक देशांना मोठा दिलासा मिळत आहे. मात्र, दुसरीकडे आज (25 मे) सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दरात मोठी वाढ झाली आहे. ज्यामुळे सर्वसामान्यांना मोठा धक्का बसला आहे, चांदीच्या दरात 1.5 टक्क्यांहून अधिक वाढ झाली आहे. तर दुसरीकडे, सोन्याच्या दरात सुमारे 0.40 टक्क्यांची वाढ झाली आहे.

हेही वाचा – मुंबईत बेस्ट डेपोमध्ये भीषण आग; दोन बसेस जळून खाक, रात्री नेमकं काय घडलं?

सोने-चांदीच्या दरात किती रूपयांनी झाली वाढ?

आज सोन्याचा भाव 0.39 टक्क्यांनी म्हणजेच 621 रुपयांनी वाढून प्रति 10 ग्रॅम 1,59,300 रुपये एवढा झाला आहे. तर दुसरीकडे, चांदीचा भाव 1.55 टक्क्यांनी म्हणजेच 4214 रुपयांनी वाढून प्रति किलो 2,76,060 रुपये एवढा झाला आहे.

सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवशी, 5 जून रोजी डिलिव्हरी होणाऱ्या सोन्याचा भाव, गेल्या आठवड्यातील शुक्रवारच्या प्रति 10 ग्रॅम ₹1,58,679 या बंद भावाच्या तुलनेत ₹471 ने वाढून ₹1,59,150 वर उघडला. आजच्या व्यवहारादरम्यान, सोन्याचे भाव दिवसातील उच्चांकी ₹1,59,500 प्रति 10 ग्रॅमवरून वाढून ₹1,59,014 प्रति 10 ग्रॅमवर ​​पोहोचले आहेत. म्हणजेच मागील सत्राच्या तुलनेत आज सोन्याच्या भावात ₹821 रूपयांची वाढ झाली आहे.

3 जुलै रोजी डिलिव्हरी होणाऱ्या चांदीचा भाव आज प्रति किलोग्राम ₹276,683 वर उघडला, जो गेल्या आठवड्यातील शुक्रवारच्या ₹271,846 च्या बंद भावाच्या तुलनेत ₹4,837 ची लक्षणीय वाढ आहे. आजच्या व्यवहारादरम्यान, चांदीचे भाव दिवसभरातील उच्चांकी ₹276,888 प्रति किलोग्राम ते नीचांकी ₹275,428 प्रति किलोग्राम पर्यंत होते. म्हणजेच मागील सत्राच्या तुलनेत आज चांदीच्या भावात ₹5,042 रूपयांची वाढ झाली आहे.

 

img

Lokshevay

Lokshevay.Com

लोकशिवाय एक विश्वासार्ह न्यूज चॅनेल आहे, जे अचूक, निष्पक्ष आणि प्रभावी बातम्या पोहोचवण्यासाठी समर्पित आहे. ब्रेकिंग न्यूजपासून सखोल विश्लेषणापर्यंत, आम्ही राजकारण, समाज, व्यवसाय आणि संस्कृतीवरील ताज्या घडामोडी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. सत्य आणि पारदर्शकतेवर भर देत, लोक सेवा लोकांचा आवाज बनून प्रत्येक गोष्टीचे महत्त्व अधोरेखित करते.

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts