• Home
  • बिजनेस
  • सोने-चांदीत जोरदार वाढ; चांदी ₹4500 ने उसळली, सोनंही महागलं, जाणून घ्या आजचे नवीन दर
Top News

सोने-चांदीत जोरदार वाढ; चांदी ₹4500 ने उसळली, सोनंही महागलं, जाणून घ्या आजचे नवीन दर

gold silver 2

Gold-Silver Rate | मागील काही दिवसांपासून सोने (Gold) आणि चांदीच्या (Silver) दरात चढ-उतार होताना दिसत आहेत. आताही सोने आणि चांदीच्या दरात (Gold-Silver Rate) पुन्हा एकदा मोठी वाढ झाली आहे. सोने आणि चांदीच्या या वाढत्या किमतींमुळे सर्वसामान्यांना मोठा फटका बसलाGold आहे. तर सोने-चांदीच्या वाढत्या दरांमुळे गुंतवणूकदार आणि खरेदीदार दोघांचेही लक्ष बाजारावर केंद्रित झाले आहे. आज देशांतर्गत बाजारात मौल्यवान धातूंमध्ये मोठी तेजी दिसून आली, ज्यामुळे येत्या काही दिवसांत किमतींची दिशा काय असेल यावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा – रोमॅन्सच्या नावाखाली घात; प्रियकराला खुर्चीवर बसवलं, डोळे झाकले अन्.. प्रेयसीने केलं भयंकर कृत्य

सोने-चांदीच्या दरात झाली मोठी वाढ

मल्टी कमोडिटी एक्सचेंज ऑफ इंडिया (MCX) वर सोन्याच्या दरात ₹2,000 पेक्षा जास्त वाढ होऊन ते प्रति 10 ग्रॅम अंदाजे ₹1,53,699 वर पोहोचले आहे. तर चांदीच्या दरातही जवळपास ₹4,700 ची वाढ होऊन चांदी प्रति किलोग्रॅम ₹2,49,423 वर जाऊन पोहोचली आहे. ही वाढ अलीकडच्या काळातील सर्वात मोठ्या वाढींपैकी एक मानली जात आहे. त्यामुळे गुंतवणूकदारांना मोठा धक्का बसला आहे.

जागतिक बाजारात सोन्याच्या दरात देखील वाढ झाली. स्पॉट गोल्ड जवळपास 0.8 टक्क्यांनी वाढून 4,755 डॉलरवर पोहोचले आहे. यावरून हे स्पष्ट होतं आहे की, आंतरराष्ट्रीय संकेत देखील देशांतर्गत बाजाराला पाठिंबा देत आहेत. तर अमेरिका आणि इराण यांच्यातील तणाव आणि शस्त्रसंधीच्या अनिश्चित स्थितीमुळे गुंतवणूकदार सुरक्षित गुंतवणुकीकडे आकर्षित झाले आहेत.

दरम्यान, बाजार तज्ज्ञांच्या मते, जोपर्यंत जागतिक अनिश्चितता कायम राहील, तोपर्यंत सोने आणि चांदीच्या किमतींमध्ये चढ-उतार होत राहतील. गुंतवणूकदारांना सावध राहण्याचा आणि बाजाराच्या दिशेवर लक्ष ठेवण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts