• Home
  • लाईफस्टाईल
  • आता WhatsApp वर चॅटिंगसाठी पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या एका क्लिकवर मेटाचा नवा प्लॅन
लाईफस्टाईल

आता WhatsApp वर चॅटिंगसाठी पैसे मोजावे लागणार? जाणून घ्या एका क्लिकवर मेटाचा नवा प्लॅन

Whatsapp

WhatsApp Plus: आता लवकरच WhatsApp वर चॅटिंग करण्यासाठी पैसे द्यावे लागणार आहे. मताचा नवा प्लॅन नेमका काय आहे. चला तर जाणून घेऊयात थोडक्यात माहिती.

WhatsApp हा जगभरातील सर्वाधिक वापरला जाणारा मेसिजिंग अ‍ॅप पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. “WhatsApp Plus” नावाच्या प्रीमियम प्लॅनबाबत सुरू असलेल्या चर्चांमुळे अनेक युजर्समध्ये गोंधळ निर्माण झाला आहे. यापुढे चॅटिंगसाठी पैसे द्यावे लागणार का?

मात्र प्राथमिक माहितीनुसार, सामान्य वापरकर्त्यांसाठी रोजच्या वापरातील सर्व बेसिक सुविधा पूर्वीप्रमाणेच मोफत राहणार आहेत. म्हणजेच मेसेज पाठवणे, व्हाईस आणि व्हिडिओ कॉल्स तसेच एंड-टू-एंड एन्क्रिप्शन यावर कोणताही बदल होणार नाही.

हेही वाचा: एकांतात बोलायचे म्हणत पतीने पत्नीला खोलीत नेलं; पेट्रोल टाकून जिवंत जाळलं, नंतर…

WhatsApp Plus म्हणजे काय?

WhatsApp Plus हा एक अतिरिक्त (optional) सब्सक्रिप्शन प्लॅन असल्याची माहिती समोर येत आहे. हा प्लॅन खास त्या यूजर्ससाठी असेल ज्यांना अ‍ॅपमध्ये अधिक कस्टमायझेशन आणि एक्स्ट्रा फीचर्स हवे आहेत.

कोणते बदल अपेक्षित?

या प्रीमियम प्लॅनमध्ये खालील सुविधा मिळू शकतात:

वेगवेगळ्या थीम्स आणि डिझाईन पर्याय
कस्टम स्टिकर्स आणि आयकॉन बदलण्याची सुविधा
अधिक चॅट्स पिन करण्याचा पर्याय
स्वतंत्र नोटिफिकेशन आणि रिंगटोन सेटिंग
चॅटिंग अनुभव अधिक वैयक्तिक करण्याचे पर्याय
उपलब्धता आणि वापर

ही सुविधा सध्या टेस्टिंग टप्प्यात असल्याची माहिती आहे आणि प्राथमिक चाचणी अँड्रॉइड यूजर्ससाठी सुरू आहे. पुढील काळात ती टप्प्याटप्प्याने रोलआउट केली जाऊ शकते.

महत्त्वाचे म्हणजे, ही सुविधा WhatsApp Messenger साठीच मर्यादित असण्याची शक्यता आहे आणि WhatsApp Business अ‍ॅपमध्ये ती उपलब्ध नसेल.

सब्सक्रिप्शन कसे काम करेल?

या प्लॅनसाठी यूजर्सना अ‍ॅपच्या सेटिंग्समधून सब्सक्रिप्शन सुरू करावे लागेल. पेमेंट अ‍ॅप स्टोअरद्वारे होईल आणि दर महिन्याला ऑटो-रिन्यू होण्याची शक्यता आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts