• Home
  • महाराष्ट्र
  • मुंबईत बेस्ट डेपोमध्ये भीषण आग; दोन बसेस जळून खाक, रात्री नेमकं काय घडलं?
Mumbai

मुंबईत बेस्ट डेपोमध्ये भीषण आग; दोन बसेस जळून खाक, रात्री नेमकं काय घडलं?

bus fire

Mumbai News | मुंबईत (Mumbai) बेस्ट बस डेपोला भीषण आग (Fire) लागल्याची घटना घडली आहे. मुंबईतील सायन परिसरातील प्रतीक्षा नगर बेस्ट बस डेपोमध्ये मध्यरात्री भीषण आग लागल्याची घटना घडली. या घटनेत दोन बेस्ट बस जळून खाक झाल्याची माहिती समोर आली आहे. तर मध्यरात्री अचानक बस डेपोला आग लागल्याने तेथील परिसरातील नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा – रायगड हादरलं! 700 फूट खोल दरीत स्कॉर्पिओ कोसळून भीषण अपघात, 8 जण ठार

नेमकं घडलं काय?

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रतीक्षा नगर बेस्ट बस डेपोमध्ये रात्री 12.15 च्या सुमारास मोठी आग लागली. ही आग एवढी भीषण होती की यामध्ये बसलाही आग लागली होती. बसला आग लागल्याची माहिती समजताच डेपोतील कर्मचाऱ्यांनी तातडीनं अग्निशमन दलाला याबाबतची माहिती दिली. त्यानंतर अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल होत त्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. यादरम्यान अग्निशमन दल पहिल्या बसची आग विझवत असतानाच काही वेळानंतर अचानक दुसऱ्या बसनेही मोठा पेट घेतला होता. यामुळे अग्निशमन दलासमोर मोठे आव्हान उभे राहीले होते.

एका बसनंतर दुसऱ्या बसलाही भीषण आग लागल्याने मोठी खळबळ उडाली होती. मात्र, अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न करत दोन्ही बसला लागलेल्या आगींवर पूर्णपणे नियंत्रण मिळवलं. सुदैवानं या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण बस डेपोचे आणि दोन्ही बसचे मोठे नुकसान झाले आहे.

दरम्यान, दोन्ही बसेसला आग नेमकी कोणत्या कारणामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालेले नाहीये. बस लागलेली आग ही शॉर्ट सर्किटमुळे लागली की काही तांत्रिक बिघाडामुळे लागली, याचा तपास अग्निशमन दलाकडून केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts