Breaking News :
  • Home
  • Top News
  • थोडं-थोडं करून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; अवघ्या काही दिवसांत इंधन 7 रुपयांनी महाग
Top News

थोडं-थोडं करून सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री; अवघ्या काही दिवसांत इंधन 7 रुपयांनी महाग

Fuel Price Hike

Fuel Price Hike: इराण-इस्रायल संघर्षानंतर गेल्या काही दिवसांपासून देशात इंधनाच्या किमतींमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. याचा थेट परिणाम सर्वसामान्यांच्या खिशावर होत असून बजेटवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे. दरम्यान, पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ झाल्याने महागाईचा दबाव अधिकच वाढला आहे.

पेट्रोल आणि डिझेलच्या दरात गेल्या काही दिवसांत सातत्याने वाढ होत असून सर्वसामान्यांच्या खिशावर याचा थेट परिणाम दिसून येत आहे. टप्प्याटप्प्याने करण्यात आलेल्या या दरवाढीमुळे अवघ्या काही दिवसांत इंधन सुमारे 7 रुपयांनी महागले असून वाहनधारक, व्यापारी आणि सामान्य नागरिकांच्या बजेटवर अतिरिक्त ताण निर्माण झाला आहे.

हेही वाचा: विधान परिषदेसाठी महायुतीचा अंतिम फॉर्म्युला ठरला; जाणून घ्या कोणाच्या वाट्याला किती जागा?

पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे नागरिक त्रस्त

देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किमतींमुळे नागरिकांच्या खर्चात मोठी वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांत इंधनाच्या दरात सलग वाढ करण्यात आली असून वाहनधारक, प्रवासी तसेच व्यावसायिक वर्ग चिंतेत आहे. दरवाढीमुळे वाहतूक खर्च वाढणार असून त्याचा परिणाम दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

आंतरराष्ट्रीय बाजार पेठ

आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतींमध्ये झालेली वाढ, जागतिक स्तरावरील तणावपूर्ण परिस्थिती आणि आयातीवरील वाढलेला खर्च यामुळे देशांतर्गत पेट्रोलियम कंपन्यांवर आर्थिक दबाव निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर कंपन्यांनी इंधन दरांमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे बोलले जात आहे.

नरेंद्र मोदी आवाहन

दरम्यान, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नागरिकांना इंधन आणि इतर आवश्यक संसाधनांचा संयमाने वापर करण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढू लागल्याने या विषयावर राजकीय आणि सामाजिक चर्चांनाही वेग आला आहे.

मागील काही दिवसांतील दरवाढ

15 मे : पेट्रोल 3 रुपये, डिझेल 3.11 रुपये वाढ
19 मे : पेट्रोल 87 पैसे, डिझेल 90 पैसे वाढ
23 मे : PETROL 90 पैसे, डिझेल 91 पैसे वाढ
25 मे : पेट्रोल 2.61 रुपये, डिझेल 2.17 रुपये वाढ

या वाढीनंतर अवघ्या दहा दिवसांत पेट्रोलच्या दरात सुमारे 7 रुपयांपेक्षा अधिक वाढ झाली असून डिझेलही 7 रुपयांच्या आसपास महागले आहे.

महाराष्ट्रातील काही शहरांमधील नवीन दर

मुंबई

पेट्रोल : 111.12 रुपये प्रति लिटर
डिझेल : 97.68 रुपये प्रति लिटर

ठाणे

पेट्रोल : 111.27 रुपये
डिझेल : 97.92 रुपये

नागपूर

पेट्रोल : 111.70 रुपये
डिझेल : 98.76 रुपये

सोलापूर

पेट्रोल : 111.87 रुपये
डिझेल : 98.55 रुपये

कोल्हापूर

पेट्रोल : 111.77 रुपये
डिझेल : 98.46 रुपये

भंडारा

पेट्रोल : 112.32 रुपये
डिझेल : 98.99 रुपये

बुलढाणा

पेट्रोल : 112.49 रुपये
डिझेल : 99.16 रुपये

अहिल्यानगर

पेट्रोल : 111.60 रुपये
डिझेल : 98.27 रुपये

सिंधुदुर्ग

पेट्रोल : 113.18 रुपये
डिझेल : 99.83 रुपये

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts