Breaking News :
  • Home
  • ताज्या बातम्या
  • Government Schemes: म्हातारपणी मुलांवर अवलंबून राहण्याची गरज नाही! आतापासूनच ‘या’ 3 योजनांमध्ये गुंतवा पैसे, मिळवा नियमित उत्पन्न
बिजनेस

Government Schemes: म्हातारपणी मुलांवर अवलंबून राहण्याची गरज नाही! आतापासूनच ‘या’ 3 योजनांमध्ये गुंतवा पैसे, मिळवा नियमित उत्पन्न

Government Schemes
8
Government Schemes: निवृत्तीनंतर नियमित उत्पन्न सुरू राहावे आणि वृद्धापकाळात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागू नये, यासाठी आतापासूनच गुंतवणुकीचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे. केंद्र सरकारच्या या तीन योजनांमधून नियमित व्याज किंवा पेन्शनचा लाभ मिळू शकतो. जाणून घ्या कोणत्या योजना, गुंतवणुकीची मर्यादा आणि दरमहा किती उत्पन्न मिळू शकते.

Government Schemes for Retirement: नोकरीतून निवृत्त झाल्यानंतर (Retirement Plans)नियमित पगार बंद होतो; मात्र घरखर्च, औषधोपचार आणि दैनंदिन गरजा सुरूच राहतात. त्यामुळे म्हातारपणी आर्थिक आधार असणे अत्यंत महत्त्वाचे आहे. यासाठी केंद्र सरकारच्या (Government Schemes) काही बचत आणि पेन्शन योजना उपयोगी ठरू शकतात. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम( Monthly Income Scheme) , सीनियर सिटीजन सेव्हिंग्स स्कीम आणि नॅशनल पेन्शन सिस्टम या तीन पर्यायांच्या माध्यमातून निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचे नियोजन करता येते. विशेष म्हणजे योग्य गुंतवणूक आणि नियोजन केल्यास दरमहा 10 हजार रुपयांपर्यंत उत्पन्न मिळवण्याचे उद्दिष्ट साध्य करता येऊ शकते. जाणून घेऊया या योजनांचे व्याजदर, पात्रता आणि गुंतवणुकीचे गणित.

हेही वाचा: निळ्या टिशू सिल्क साडीत पूजा सावंतचा शाही अंदाज! ‘लग्न आणि बरंच काही’च्या प्रमोशनदरम्यान खुललं सौंदर्य

निवृत्तीनंतर आर्थिक आधारासाठी सरकारी योजनांचा पर्याय

नोकरी करत असताना दर महिन्याला मिळणाऱ्या पगारातून घरखर्च आणि इतर जबाबदाऱ्या पार पाडणे सोपे जाते. मात्र, निवृत्तीनंतर उत्पन्नाचे नियमित साधन नसल्यास आर्थिक अडचणी निर्माण होऊ शकतात. विशेषतः खासगी क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी निवृत्तीचे नियोजन लवकर सुरू करणे गरजेचे आहे.

अशा परिस्थितीत सरकारी बचत योजना आणि पेन्शन योजना मदतीला येऊ शकतात. काही योजनांमध्ये निश्चित व्याजाच्या माध्यमातून नियमित उत्पन्न मिळते, तर काही योजनांमध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीतून निवृत्तीनंतर पेन्शन मिळवता येते.

1. पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम (MIS)

दर महिन्याला ठरावीक व्याजाची रक्कम हवी असणाऱ्यांसाठी पोस्ट ऑफिसची मंथली इनकम स्कीम हा एक पर्याय आहे. या योजनेत एकरकमी गुंतवणूक केल्यानंतर दर महिन्याला व्याज मिळते. त्यामुळे निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नाचे नियोजन करता येते.

सध्या ऑक्टोबर ते डिसेंबर 2026 या तिमाहीसाठी या योजनेवर वार्षिक 7.4 टक्के व्याजदर लागू आहे.

गुंतवणुकीचे गणित समजून घ्या :

5 लाख रुपये गुंतवल्यास दरमहा सुमारे 3,083 रुपये व्याज मिळेल.
9 लाख रुपये गुंतवल्यास दरमहा सुमारे 5,550 रुपये मिळतील.
संयुक्त खात्यात 15 लाख रुपये गुंतवल्यास दरमहा सुमारे 9,250 रुपये व्याज मिळू शकते.
या योजनेत एकट्याच्या खात्यासाठी कमाल गुंतवणूक मर्यादा 9 लाख रुपये, तर संयुक्त खात्यासाठी 15 लाख रुपये आहे. योजनेचा कालावधी पाच वर्षांचा आहे. मुदत पूर्ण झाल्यानंतर मूळ गुंतवणूक नियमानुसार परत मिळते.

2. सीनियर सिटीजन सेव्हिंग्स स्कीम (SCSS)

निवृत्तीनंतर आर्थिक सुरक्षितता मिळवू इच्छिणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांसाठी सीनियर सिटीजन सेव्हिंग्स स्कीम हा महत्त्वाचा पर्याय आहे. या योजनेत 60 वर्षे किंवा त्याहून अधिक वयाच्या व्यक्तींना खाते उघडता येते. काही अटींच्या अधीन राहून 55 ते 60 वयोगटातील निवृत्त व्यक्तींनाही या योजनेचा लाभ घेता येतो.

सध्या या योजनेवर वार्षिक 8.2 टक्के व्याज दिले जात आहे. यामध्ये कमाल 30 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करता येते.

किती मिळणार व्याज?

समजा, तुम्ही या योजनेत 10 लाख रुपये जमा केले, तर वार्षिक व्याज सुमारे 82 हजार रुपये मिळेल. ही रक्कम दर तीन महिन्यांनी 20,500 रुपयांच्या स्वरूपात खात्यात जमा होईल.

जर तुम्ही कमाल 30 लाख रुपयांची गुंतवणूक केली, तर वार्षिक व्याज 2 लाख 46 हजार रुपये होईल. म्हणजेच दर तीन महिन्यांनी 61,500 रुपये मिळतील.

या योजनेचा नियमित कालावधी पाच वर्षांचा असून, नियमानुसार आणखी तीन वर्षांसाठी मुदतवाढ घेण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

3. नॅशनल पेन्शन सिस्टम (NPS)

निवृत्तीनंतर पेन्शनची व्यवस्था आधीपासूनच करून ठेवायची असेल, तर नॅशनल पेन्शन सिस्टम म्हणजेच NPS हा दीर्घकालीन गुंतवणुकीचा पर्याय आहे. नोकरी करत असतानाच या योजनेत नियमित योगदान देता येते.

NPS अंतर्गत जमा होणारी रक्कम विविध बाजाराधारित साधनांमध्ये गुंतवली जाते. त्यामुळे मिळणारा परतावा निश्चित नसतो आणि गुंतवणुकीत बाजारातील जोखीम असते.

हेही वाचा: नॅक मूल्यांकनाचे नियम बदलले! आता कॉलेजचा दर्जा ठरणार ‘या’ महत्त्वाच्या निकषांवर; जाणून घ्या नवे नियम काय?

दरमहा 10 हजार रुपये पेन्शन कशी मिळू शकते?

समजा, निवृत्तीच्या वेळी तुमच्या NPS खात्यात 50 लाख रुपये जमा झाले आहेत. नियमानुसार लागू असलेल्या अटींनुसार यातील किमान 40 टक्के रक्कम म्हणजेच 20 लाख रुपये अॅन्युइटी खरेदी करण्यासाठी वापरली.

जर अॅन्युइटीवर वार्षिक 6 टक्के दराने पेन्शन मिळाली, तर गणित पुढीलप्रमाणे असेल :

एकूण NPS निधी : 50 लाख रुपये

अॅन्युइटीसाठी वापरलेली रक्कम : 20 लाख रुपये
अॅन्युइटीचा गृहीत वार्षिक दर : 6 टक्के
वार्षिक पेन्शन : 1 लाख 20 हजार रुपये
अंदाजे मासिक पेन्शन : 10 हजार रुपये

उर्वरित 30 लाख रुपये एकरकमी मिळू शकतात. मात्र, प्रत्यक्ष पेन्शन अॅन्युइटीचा पर्याय, त्या वेळचे दर आणि लागू नियमांवर अवलंबून असेल.

निवृत्तीनंतर नियमित उत्पन्नासाठी कोणती योजना निवडावी?

या तिन्ही योजनांचे उद्दिष्ट आणि फायदे वेगवेगळे आहेत. पोस्ट ऑफिस MIS मध्ये दरमहा व्याज मिळते, SCSS मध्ये ज्येष्ठ नागरिकांना त्रैमासिक व्याज दिले जाते, तर NPS मध्ये दीर्घकालीन गुंतवणुकीतून निवृत्तीनंतर पेन्शनची व्यवस्था करता येते.

त्यामुळे गुंतवणूक करण्यापूर्वी स्वतःचे वय, उपलब्ध बचत, नियमित उत्पन्नाची गरज आणि आर्थिक उद्दिष्टे लक्षात घेणे आवश्यक आहे. योग्य नियोजन केल्यास निवृत्तीनंतर आर्थिक स्वावलंबन टिकवणे अधिक सोपे होऊ शकते.

सध्याचे व्याजदर (ऑक्टोबर–डिसेंबर 2026)

पोस्ट ऑफिस MIS – 7.4%

SCSS – 8.2%

NPS –

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts