• Home
  • बिजनेस
  • यंदाच्या अर्थसंकल्पात तरुणांना गोड बातमी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या कसं असेल यंदाचे बजेट
बिजनेस

यंदाच्या अर्थसंकल्पात तरुणांना गोड बातमी मिळण्याची शक्यता; जाणून घ्या कसं असेल यंदाचे बजेट

Budget 2026 youth benefits

Budget 2026 youth benefits : 1 फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प जाहीर करण्यात येणार आहे. या अर्थसंकल्पा तरुणांना गोड बातमी मिळण्याची शक्यता आहे. कारण नवीन कर्मचारी भरती करणाऱ्या कंपन्यांना थेट आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी सरकारचे लक्ष रोजगाराच्या संबंधित प्रोत्साहन देण्यासंदर्भातील ELI योजनेवर आहे. याशिवाय पीएम इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून 1 कोटी तरुणांना सुसज्ज आणि मोठ्या कंपन्यांमध्ये प्रशिक्षण मिळण्याची संधी उपलब्ध होऊन 6000 ते 7000 मासिक रुपये वेतन मिळण्याची अशा आहे.

कौशल्य कामगारांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार

सध्या आर्टिफिशियल इंटेलिजेंट (AI), रोबोटिक्स आणि ग्रीन एनर्जी यासारख्या क्षेत्रांमध्ये मोफत प्रशिक्षण आणि प्रमाणपत्र कोर्सेसला मोठी मागणी आहे. यामुळेच महत्वपूर्ण निर्णय यंदाच्या अर्थसंकल्पात होण्याची शक्यता आहे. तसेच मनरेगाला विश्व भारत हमी यात रूपांतरित करून ग्रामीण तरुणांना 125 दिवसांची कामाची हमी मिळण्याची शक्यता आहे. यंदा सादर करण्यात येणारे बजेट हे पदवी शिक्षण असलेल्यांसाठीच नाही तर कौशल्य कामगारांवर लक्ष केंद्रित ठेवण्यासाठी असणार आहे.

1 कोटी तरुणांना इंटर्नशिप मिळू शकते

पीएम इंटर्नशिप योजनेच्या माध्यमातून वेतन वाढवण्याचा विचार सरकार करत असून यासाठीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. सध्या या योजनेच्या माध्यमातून 5000 रुपये दिले जातात. परंतु आता हा आकडा 6 ते 7 हजार रुपयांवर जाण्याची शक्यता आहे. या योजनेच्या माध्यमातून पुढील 5 वर्षात टॉप 500 कंपन्यात 1 कोटी तरुणांना इंटर्नशिप मिळू शकते.

हे ही वाचाइतरांची शेती कसणाऱ्या शेतकऱ्यांना खरंच मिळणार का पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता; काय आहे सत्य

लघु उद्योगांना कमी व्याजदराने कर्ज आणि अनुदान मिळू शकेल

यंदाच्या अर्थसंकल्पात सरकार वस्त्रोद्योग, चामडे, पादत्राणे आणि अन्न प्रक्रिया यासारख्या क्षेत्रांसाठी अधिक निधी जाहीर होण्याची शक्यता आहे. जेणेकरून लघु उद्योगांना कमी व्याजदराने कर्ज आणि अनुदान मिळू शकेल, आणि रोजगार वाढण्यास मदत होईल.

उच्च तंत्रज्ञानाच्या नोकऱ्यांसाठी प्रयत्नशील

सरकार तरुणांना फक्त कामगार म्हणून नाही तर उच्च तंत्रज्ञानाच्या नोकऱ्यांसाठी तयार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यानुषंगाने मोठा निर्णय घेण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याशिवाय ग्रामीण रोजगार आणि त्यासाठीच्या संधी अशा अनेक मुद्यांवर सरकार लक्ष देऊ शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Posts