Rajasthan major accident : राजस्थानच्या जोधपूरमध्ये एक मोठा अपघात झाला. फलोदी जिल्ह्यातील माटोडा इथं रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रक-ट्रेलरला एका टेम्पो-ट्रेलरनं धडक दिली. या अपघातात पंधरा जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. कोलायतला भेट देऊन भाविक जोधपूरला परतत असताना त्यांच्या टेम्पो-ट्रेलरला अपघात झाला. या दुर्घटनेवर राष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त केला. तसंच मदतीची घोषणाही केली.
हे ही वाचा – England train attack : इंग्लंडमध्ये धावत्या ट्रेनमध्ये अनेक जणांवर चाकू हल्ला; दहा जण जखमी
अपघाताबद्दल मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केलं दुःख
जोधपूरमधील फलोदी इथं झालेल्या या भीषण अपघाताबद्दल राजस्थानचे मुख्यमंत्री भजन लाल शर्मा यांनी तीव्र दुःख व्यक्त केलं. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकारी, एसपी आणि अधिकाऱ्यांना फोनवरुन निर्देश दिले. त्यांनी तातडीनं ग्रीन कॉरिडॉर तयार करण्याचे आणि जखमींना रुग्णालयात नेण्याची व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. जखमींना शक्य तितके सर्वोत्तम उपचार देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.
Phalodi, Rajasthan | An accident occurred on the Bharat Mala Highway. A tempo-traveller coming from Kolayat, Bikaner, rammed into a trailer parked on the road from behind. 15 people were killed and 2 were injured in the accident. All the bodies have been kept in the mortuary of… https://t.co/ShjzLYgcdG
— ANI (@ANI) November 2, 2025
भारत माला महामार्गावर अपघात
जिल्हाधिकारी श्वेता चौहान यांनी सांगितलं की, भारत माला महामार्गावर अपघात झाला. कोलायत, बिकानेर येथून येणारा एक टेम्पो-ट्रेलर मागून रस्त्यावर उभ्या असलेल्या ट्रेलरला धडकला. या अपघातात पंधरा जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. सर्व मृतदेह ओसियान येथील सरकारी रुग्णालयाच्या शवागारात ठेवण्यात आले आहेत, तर जखमींनाही उपचारासाठी जोधपूरला पाठवण्यात आले आहे.
कोलायत मेळा पाहण्यासाठी गेले होते
फलोदी पोलीस स्टेशनचे प्रभारी अमनाराम यांनी सांगितलं की, टेम्पो ट्रॅव्हलरमध्ये प्रवास करणारे लोक जोधपूरच्या सुरसागर भागातील एका कुटुंबातील होते. ते कोलायत मेळा पाहण्यासाठी गेले होते. परतीच्या प्रवासात हा दुर्दैवी अपघात घडला. मृतांच्या कुटुंबियांना कळवण्यात आले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात येत आहेत.”






