Telangana bus truck accident : तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यातील मिर्झागुडा इथं टीजीएसआरटीसी बसला टिप्पर ट्रकनं धडक दिली. या भीषण अपघातात 20 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. खडी भरलेल्या लॉरीशी धडकल्यानंतर बस खडी आणि ढिगाऱ्यात अडकली होती. स्थानिक पोलिसांनी सांगितलं की, “रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला पोलीस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या खानपूर गेटजवळ टीजीएसआरटीसी बस आणि ट्रकमध्ये अपघात झाला. अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. ही घटना आज सकाळी घडली. आम्ही घटनास्थळी पोहोचलो आहोत आणि अधिक माहिती नंतर जाहीर केली जाईल.”
मंत्र्यांनी दिल्या अधिकाऱ्यांना सूचना :
तेलंगणा मंत्री पोन्नम प्रभाकर यांनी एका प्रेस निवेदनात रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला विभागातील खानपूर गेट इथं झालेल्या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले. त्यांनी आरटीसी एमडी नागी रेड्डी आणि रंगारेड्डी जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरुन बोलून जखमींना दर्जेदार वैद्यकीय सेवा देण्यासाठी आवश्यक पावलं उचलण्याचे निर्देश दिले. चुकीच्या दिशेनं येणाऱ्या टिपर ट्रकनं बसला धडक दिल्यानं हा अपघात झाला, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं. मंत्र्यांनी आरटीसी अधिकाऱ्यांना तातडीनं अपघातस्थळी पोहोचण्याचे निर्देश दिले आहेत.
हे हि वाचा : राजस्थानमध्ये मोठा अपघात! रस्त्याच्या कडेला असलेल्या ट्रेलरला टेम्पो ट्रॅव्हलर धडकली; 15 जणांचा मृत्यू
मुख्यमंत्री रेड्डींनी केलं दुःख व्यक्त :
तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी रंगारेड्डी जिल्ह्यातील चेवेल्ला मंडल येथे झालेल्या रस्ते अपघाताबद्दल दुःख व्यक्त केलं. मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना तातडीनं घटनास्थळी पोहोचून आवश्यक ती मदत उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. अपघाताची संपूर्ण माहिती वेळेवर कळवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. बस अपघातात जखमी झालेल्या सर्व नागरिकांना तातडीनं हैदराबादला पोहोचवण्याचे आणि त्यांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा देण्याची व्यवस्था करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना दिले आहेत. उपलब्ध मंत्र्यांना तातडीनं अपघातस्थळी पोहोचण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.
#UPDATE | Telangana Transport Minister Ponnam Prabhakar tells ANI, “Around 20 people died, around 20 are getting treatment in hospital, 3 are critically injured.” https://t.co/2oaeWyzBEC
— ANI (@ANI) November 3, 2025
पंतप्रधानांकडून नुकसान भरपाईची घोषणा (Telangana bus truck accident)
पंतप्रधान मोदींनी तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात झालेल्या अपघातात मृतांच्या कुटुंबियांना पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपये आणि जखमींना 50000 रुपये सानुग्रह अनुदान जाहीर केलं आहे. “तेलंगणातील रंगारेड्डी जिल्ह्यात झालेल्या अपघातात झालेले जीवित आणि वित्तहानी अत्यंत दुःखद आहे. या कठीण काळात माझ्या संवेदना बाधित लोक आणि त्यांच्या कुटुंबियांसोबत आहेत. जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो,” असं पंतप्रधान कार्यालयानं पोस्टमध्ये म्हटलं आहे.











